‘एनआरएचएम’च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पुणे, ता. १५ : तीन महिन्यांपासून वेतन मिळावे तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघाकडून जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी (ता. १५) आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना निवेदन देण्यात आले़.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यामध्ये दोन हजारांहून अधिक कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत. केवळ दोन पदांचे समायोजन केले आहे, इतर पदांचे समायोजन करण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर जानेवारीपासून वेतन मिळाले नसल्याने कामाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदवला होता, तरीही वेतन न झाल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आंदोलनानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्तांना वेतनासाठी आवश्यक निधीची मागणी करणारे पत्र पाठवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

