महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे रविवारी ‘चित्र संवाद’

महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे रविवारी ‘चित्र संवाद’
Published on

पुणे, ता. ४ ः छायाचित्रकार संदेश भंडारे यांची तमाशा आणि वारी या महाराष्ट्रातील लोकपरंपरांवरील छायाचित्रे आणि पुस्तके प्रसिद्ध आहेत. या छायाचित्रांमागील भंडारे यांची भूमिका समजावून घेण्यासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे ‘चित्र संवाद’ आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ‘स्लाइड शो’च्या माध्यमातून ही छायाचित्रे पाहता येणार असून भंडारे यांच्याशी संवाद साधता येणार आहे.

डॉ. मीना प्रभू स्मरणांजली कार्यक्रम रविवारी
पुणे, ता. ४ ः ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रभू कुटुंबीयांतर्फे ‘स्मरणांजली’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता. ६) सायंकाळी चार वाजता आगरकर रस्त्यावरील गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

अभिजित चौबळ यांच्या लाकडी भित्तीचित्रांचे प्रदर्शन
पुणे, ता. ४ ः अभिजित चौबळ यांनी हाताने रंगवलेल्या लाकडी भित्तीचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार (ता. १०) ते रविवारी (ता. १३) या कालावधीत कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण कलादालनात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. चौबळ हे जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट्सचे माजी विद्यार्थी असून डिझाईन आणि जाहिरात क्षेत्रात ३८ वर्षांपासून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com