अवतीभवती

अवतीभवती
Published on

पांडुरंग शेलार यांना
समाजभूषण पुरस्कार
पुणे, ता. ४ : संविधान हक्क परिषद व मंत्रालय वार्ता यांच्यातर्फे खडकवासला पाटबंधारे विभागाचे माजी कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबई येथील मंत्रालयामधील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.
या वेळी खासदार चंद्रकांत हंडोरे, अनिल अहिरे, निशा भगत, डॉ. संजीवनी कांबळे आदी उपस्थित होते.
-----------------------
महावीर जयंतीनिमित्त
कत्तलखाने बंद ठेवावेत
पुणे, ता. ४ : भगवान महावीर जयंतीनिमित्त (ता. १०) शहर व जिल्‍ह्यातील कत्तलखाने व मांस,
मच्छी विक्रीचे दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आली.

या वेळी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, जैन संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी, महाराष्ट्र प्रदेश जैन प्रकोष्ठाचे उपाध्यक्ष विनोद सोलंकी, पुणे शहर अध्यक्ष मयूर सरनोत, उपाध्यक्ष अभिजित शाह, राजेश साळेचा, सुखदेव चरण, अरविंद जैन आदी उपस्थिती होते.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com