आज पुण्यात ५ एप्रिल २०२५ शनिवारसाठी

आज पुण्यात ५ एप्रिल २०२५ शनिवारसाठी
Published on

आज पुण्यात ५ एप्रिल २०२५ शनिवारसाठी
.........................................................
सकाळी ः
उद्‍घाटन ः रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे ः एकांकिका स्पर्धेचे उद्‍घाटन ः प्रमुख पाहुणे- रवींद्र मंकणी, प्रमोद जोशी ः अध्यक्ष- शीतल शहा ः भांडारकर इन्स्टिट्यूट ऑडिटोरियम, भांडारकर रस्ता ः
१०.००.
ग्रंथ प्रकाशन ः हर्मिस प्रकाशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर आयोजित ः ॲड. जयदेव गायकवाड लिखित ‘दलित पँथरचा झंझावात’ ग्रंथाचे प्रकाशन ः अध्यक्ष- डॉ. बाबा आढाव ः प्रमुख पाहुणे- रामदास आठवले ः पँथर चळवळीत लढलेल्यांचा सत्कार ः एस. एम. जोशी फाउंडेशन, पत्रकार भवनशेजारी, नवी पेठ ः ११.००.
प्रदर्शन ः १२ राज्यांतील कुशल कारागिरांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्त्र, साड्या, शाली आणि गालिचे आदींचे ‘दस्तकारी हाट’ वस्त्र प्रदर्शन ः काँग्रेस भवन, शिवाजीनगर ः ११.००.
दुपारी ः
पुरस्कार वितरण ः राष्ट्र सेवा परिषद आणि मराठीबोलीतर्फे ः ‘महात्मा’ व राज्यस्तरीय विविध पुरस्कारांचे वितरण ः ‘महात्मा’ पुरस्कार- डॉ. बाबा आढाव ः हस्ते- भाऊसाहेब जाधव ः संत ज्ञानेश्वर सभागृह, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, डेक्कन ः २.००.
सांस्कृतिक कार्यक्रम ः ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे ः सखी गीतरामायण व सीता स्वयंवर- सांस्कृतिक कार्यक्रम ः प्रमुख पाहुणे- देवेंद्र फडणवीस ः गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट ः ३.३०.
सायंकाळी ः
कीर्तन ः श्री ब्रह्मचैतन्य आश्रम आयोजित ः श्रीराम नवमी उत्सव ः वैशाली बापट यांचे कीर्तन ः आश्रमात, ५०४/२, पर्वती गाव, श्रीराम मंदिर ः ५.००.
प्रकाशन ः राजलक्ष्मी कलादर्शन, प्रतीक प्रकाशन व बियाँड एंटरटेन्मेंटतर्फे ः वंदना कुलकर्णी लिखित ‘बिमल रॉय- सिनेमा’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- डॉ. सदानंद मोरे ः उपस्थिती- रिकी रॉय-भट्टाचार्य, मनोहर अय्यर, सुलभा तेरणीकर ः राजलक्ष्मी कलादर्शन, कोथरूड ः ५.३०.
सांगीतिक कार्यक्रम ः बेडेकर गणपती मंदिर व काणेबुवा प्रतिष्ठान रामनवमी महोत्सव ः डॉ. अश्विनी भिडे यांचे गायन ः ४३/२. रामबाग कॉलनी, पौड रस्ता, कोथरूड ः ५.३०.
श्रीसूक्त पठण ः देशपांडे श्रीराम मंदिर आयोजित ः श्रीराम जन्मोत्सव सोहळा ः कार्यक्रम-कौसल्या मातेचे डोहाळे व श्रीसूक्त पठण ः मंदिरात, अंबाईदरा रस्ता, धायरी ः ५.३०.
वर्धापन दिन व पुरस्कार वितरण ः निसर्गसेवक आयोजित ः संस्थेचा वर्धापन दिन ः निसर्गसेवक पुरस्कार ः पुरस्कारार्थी- महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनी संस्था ः धोंडूमामा साठे सभागृह, संजीवन हॉस्पिटलजवळ, कर्वे रस्ता ः ५.३०.
व्‍याख्यान व संगीत सभा ः सद्‍गुरू श्री जंगली महाराज १३५ वा पुण्यतिथी महोत्सव ः ‘भारताची महासत्तेकडे वाटचाल’ या विषयावर डॉ. उदय निरगुडकर यांचे व्याख्यान ः संतवाणी- रघुनाथ खंडाळकर ः जंगली महाराज मंदिरात, शिवाजीनगर ः ६.००.
सत्कार समारंभ ः विदिशा विचार मंच आणि कोहिनूर ग्रुप आयोजित ः सहा प्रकाशन संस्थांचा प्रातिनिधिक सन्मान ः हस्ते- प्रा. रंगनाथ पठारे ः प्रमुख पाहुणे- डॉ. सतीश देसाई, कृष्णकुमार गोयल ः शिरीष सहस्रबुद्धे, सु. वा. जोशी, राजीव बर्वे, मिलिंद परांजपे, सुनीताराजे पवार व अमृता कुलकर्णी यांचा सन्मान ः दुसरा मजला, पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः ६.००.
दृक्-श्राव्य कार्यक्रम ः कै. व्यंकटेश माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘तात्यांच्या प्राणी कथा’ दृक्-श्राव्य माध्यमातून ः भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता ः ६.००.
सत्कार ः करमाळा रहिवासी संघातर्फे ः प्रा. राम शिंदे यांचा सत्कार ः इस्कॉन मंदिर हॉल, कात्रज-कोंढवा रस्ता ः ६.००.
शिवतेज दिन ः समस्त हिंदू आघाडीतर्फे ः शिवतेज दिन- शाहिस्त्याला धडा शिकवला तो दिवस ः उपस्थिती- पांडुरंग बलकवडे, मिलिंद एकबोटे, संजय भोसले ः लाल महाल, कसबा पेठ ः ६.००.
गीतरामायण ः गीतरामायणामधील काही रचनांचे सादरीकरण ः गायक- केदार करंदीकर, श्रुती देवस्थळी, प्रणीता पेठे व वैभव दलात ः पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः ६.००.
व्याख्यान ः झेप प्रतिष्ठान आयोजित ः जागतिक आरोग्यदिनानिमित्त व्याख्यान ः विषय- स्वास्थ्यरक्षणासाठी विनाऔषधोपचार काळाची गरज ः वक्ते- डॉ. शशिकांत कुलकर्णी ः सेवा भवन, पटवर्धनबागेजवळ, कर्नाटक हायस्कूलजवळ, एरंडवणे ः ६.००.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com