हिंदवी स्वराज्याची महागाथा आजपासून उलगडणार

हिंदवी स्वराज्याची महागाथा आजपासून उलगडणार
Published on

पुणे, ता. ४ ः हिंदवी स्वराज्याची तेजस्वी महागाथा उलगडणाऱ्या ‘गोष्ट इथे संपत नाही-शिवचरित्र’ या कार्यक्रमाच्या प्रयोगांना शनिवारपासून (ता. ४) सुरुवात होत आहे. ‘अफजलखान वध’ या प्रयोगाने या आठ प्रयोगांच्या कार्यक्रमाची नांदी होईल.
सकाळ माध्यम समूहातर्फे या कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आठ महत्त्वाच्या अध्यायांवरील प्रयोग ५ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत प्रत्येक शनिवार-रविवारी सकाळी ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘रांका ज्वेलर्स’ असून सहप्रायोजक ‘रावेतकर ग्रुप’ हे आहेत. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे ‘फायनान्स पार्टनर’ असून ‘द नेचर - मुकाईवाडी’, व्हीटीपी रिॲलिटी आणि ‘शिवसृष्टी थीम पार्क’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.
मराठ्यांच्या इतिहासातील विविध घटनांवर ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमात सादरीकरण केले जाते. सारंग मांडके आणि सारंग भोईरकर हे दोघे हा अनोखा कार्यक्रम सादर करतात. यात केल्या जाणाऱ्या १३ प्रयोगांपैकी आठ प्रयोग ‘सकाळ’तर्फे आयोजित उपक्रमात सादर केले जाणार आहेत. यात अफजलखान वध, पन्हाळा ते पावनखिंड, पुरंदरचा तह, आग्य्राहून सुटका, मोहीम मांडली मोठी, शिवराज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय आणि लढाई मराठी अस्तित्वाची, या प्रयोगांचा समावेश आहे.

तिकिटांविषयी
‘गोष्ट इथे संपत नाही-शिवचरित्र’ हा उपक्रम सशुल्क असून यासाठी सीझन पास आणि प्रत्येक प्रयोगासाठीचे वैयक्तिक तिकीट उपलब्ध आहे. कार्यक्रमाची तिकीट विक्री ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर सुरू असून बालगंधर्व रंगमंदिरात देखील तिकिटे उपलब्ध आहेत. बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून देखील तिकीट आरक्षित करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com