

पुणे, ता. १० : ‘‘शासनाच्या विविध योजना सुरू असून, या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून गरजू लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे,’’ असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले.
‘यशदा’ येथे नीती आयोग व महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतात साहाय्यक तंत्रज्ञानासाठी परिसंस्था विकसित करणे’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शिरसाट बोलत होते. यावेळी नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक (दूरदृष्यप्रणालीद्वारे), नीती आयोगाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राजीवकुमार सेन, ‘यशदा’चे महासंचालक निरंजनकुमार सुधांशू, नीती आयोगाचे सहसचिव के. एस. रेजिमन उपस्थित होते.
शिरसाट म्हणाले, ‘‘दिव्यांग बांधवांना आवश्यक साधने उपलब्ध करून त्यांचा सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील गरजूंना मदत करून त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचले पाहिजे. समाजासाठी आपल्याला काही करता येईल का, त्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत. गरजू व गरीब लोकांना मदत करण्यासारखे दुसरे समाधान नाही.’’ या कार्यशाळेस गोवा, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्य सरकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.