‘पार्किन्सन्स’वरील नृत्य उपचारांसाठी आजपासून कार्यशाळा

‘पार्किन्सन्स’वरील नृत्य उपचारांसाठी आजपासून कार्यशाळा
Published on

पुणे, ता. १० ः पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी अवतरण डान्स फाउंडेशनतर्फे नृत्य उपचार पद्धती तयार करण्यात आली आहे. या उपचार पद्धतीविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी, त्याची प्रात्यक्षिके देण्यासाठी शुक्रवार (ता. ११) आणि शनिवारी (ता. १२) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात ही परिषद होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे कला संचालक हृषिकेश पवार यांनी दिली. पवार यांनी ही नृत्य उपचार पद्धती तयार केली असून, या दोनदिवसीय परिषदेत या उपचार पद्धतीची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी avartandancefoundation@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com