आज पुण्यात ७ जून २०२५ शनिवार
आज पुण्यात ७ जून २०२५ शनिवारसाठी
.............................................
सकाळी ः
उद्घाटन ः ग्रीन हिल्स ग्रुप संस्थेतर्फे देवराई फाउंडेशन, सह्याद्री देवराई, वनाई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्र आयोजित ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देवराई प्रदर्शन ः उद्घाटन हस्ते- डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. गुरुदास नुलकर, पृथ्वीराज बी. पी. ः प्रमुख पाहुणे- डॉ. महानंद माने, महादेव मोहिते, अशोक घोरपडे, संजय शिंदे, मंगेश दिघे ः बालगंधर्व कलादालन, बालगंधर्व रंगमंदिर परिसर ः ११.००.
रक्तदान अभियान ः मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे ः ईदनिमित्त राज्यव्यापी रक्तदान अभियान ः प्रमुख पाहुणे- श्रीकांत देशपांडे, अशोक धिवरे ः अध्यक्ष- डॉ. शमसुद्दीन तांबोळी ः बॅ. नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा ः ११.००.
दुपारी ः
गीत सुमन १०० ः राष्ट्र सेविका समितीतर्फे ः गीत सुमन १०० ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ः शतकपूर्तीनिमित्त १०० गीतांचा कार्यक्रम ः नवीन मराठी शाळेच्या आवारात, शनिवार पेठ ः ४.००.
सायंकाळी ः
मुलाखत ः निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच ः निळू फुले कृतज्ञता सन्मान प्रदान सोहळा ः सन्मानार्थी- प्रसाद ओक ः हस्ते- सुमीत राघवन व चंद्रकांत कुलकर्णी ः प्रसाद ओक यांची मुलाखत ः मुलाखतकार- राजेश दामले ः एमईएस बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड ः ५.००.
सांगीतिक मैफील ः स्वरनिनाद संस्थेतर्फे ः ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’ शास्त्रीय गायन-वादन मैफील ः सहभाग- शरयू दाते, एस. आकाश, अथर्व वैरागकर, अनुभव खामरू, अमन वरखेडकर, ईशा नानल व अन्य ः एफटीआयआय सभागृह, लॉ कॉलेज रस्ता ः ५.००.
मुलाखत ः स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि स्वरूपबोधिनी फाउंडेशन आयोजित ः श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाशिबिर ः ‘स्वामी मकरंदनाथ आणि मातुःश्री मधुराताई यांची प्रकट मुलाखत ः मुलाखतकार- विजय कुवळेकर ः गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट ः ५.१५.
पुरस्कार वितरण ः अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आयोजित ः पु. ग. वैद्य पहिला कार्यगौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- डॉ. रमेश पानसे ः हस्ते- गिरीश प्रमुणे ः अध्यक्ष- भारत सासणे ः प्रमुख उपस्थिती- वसुंधरा वैद्य ः पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः ६.००.
पुस्तक प्रकाशन ः प्राज परिवार आयोजित ः डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकी प्रवासातील ठळक आठवणी, नोंदी असलेल्या ‘पैलतीरावरून ....तर असं झालं’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- देवेंद्र फडणवीस ः उपस्थिती- मिलिंद जोशी ः सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ऑडिटोरियम, शिवाजीनगर ः ६.१५.
..............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.