

सातारा रस्ता ः टेंभेकर फार्म्स मैदानावर सुरू झालेल्या बारा वर्षांखालील गटाच्या सदभावना करंडक क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू स्पोर्ट्स संघाविरुद्धच्या लढतीत स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक संघाचा अद्वैत ढवळीकर सुरेख फटका मारताना.
---------------
फोटो ः गौरवी पंचवारे
अर्जुन वाहन
----------
अष्टपैलू स्पोर्ट्स, फन फिटनेस अकादमीची विजयी सलामी
सदभावना करंडक क्रिकेट
पुणे, ता. १३ ः वसंतदादा सेवा संस्था, स्टेडियम क्रिकेट क्लब आणि स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बारा वर्षांखालील गटाच्या सदभावना करंडक क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू स्पोर्ट्स आणि फन फिटनेस अकादमीने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजया सलामी दिली.
सातारा रस्त्यावरील टेंभेकर फार्म्स मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत गौरवी पंचवारेच्या ६९ धावांच्या जोरावर अष्टपैलू स्पोर्ट्सने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा ६७ धावांनी पराभव केला. अष्टपैलू स्पोर्ट्सने सहा बाद २११ धावा केल्या यावेळी गौरवी पंचवारेने ६० चेंडूत ८ चौकारांसह ६९ धावांची खेळी केली. प्रत्यूत्तर देताना स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा डाव १४४ धावांत आटोपला. अद्वैत ढवळीकरने केलेली खेळी अपुरी पडली.
दुसऱ्या लढतीत अर्जुन वाहनने केलेल्या नाबाद ६१ धावांच्या जोरावर फन फिटनेस अकादमीने विराग अकादमीचा चार गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना विराग अकादमीने चार बाद १३२ धावा केल्या यावेळी सम्राट चावरेने डाव सावरला. प्रत्यूत्तर देताना फन फिटनेस अकादमीने सहा बाद १३४ धावा करून विजय मिळविला. त्यात महत्त्वाचा वाटा अर्जुन वाहनने ६५ चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकारांसह केलेल्या नाबाद ६१ धावांचा होता.
या स्पर्धेतील ‘सामन्याचा मानकरी’ हा मान गौरवी पंचवारे व अर्जुन वाहनने पटकाविला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रो-डीजी साईनचे संचालक देवेंद्रसिंग, स्टेडियम क्लबचे संचालक भरत मारवाडी , स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी आणि अमित काळे हे उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक ः
१) अष्टपैलू स्पोर्ट्स - (२५ षटकांत) ६ बाद २११ (गौरवी पंचवारे ६९, सिध्दांतसिंग २४, ओवी देशमुख १-१३) विजयी विरूद्ध स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक - (२४.५ षटकांत) सर्वबाद १४४ (अद्वैत ढवळीकर ३३, गौरवी पंचवारे १-१, विहान निजामपुरकर १-९).
२) विराग अकादमी - (२५ षटकांत) ४ बाद १३२ (सम्राट चावरे २७, पनाश कन्याल १९, अद्वैक बधीये १-२२) पराभूत विरुद्ध फन फिटनेस अकादमी (२४ षटकांत) ६ बाद १३४ (अर्जुन वाहन नाबाद ६१, रेयांश गांगुली २-१६).
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.