

PNE26W59757
सोलापूर ः कौस्तुभ गावडे यांनी होटगी मठात डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचे दर्शन घेतले.
कौस्तुभ गावडे यांनी घेतले शिवाचार्यांचे आशीर्वाद
सोलापूर, ता. १४ : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेण्यावर भर दिला आला. सोलापूर येथील श्री काशीपीठ बृहन्मठात श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महाराज यांची कौस्तुभ गावडे यांनी आशीर्वाद घेतले.
बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला भेट देऊन शिक्षक बंधू-भगिनींशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. जुनी पेन्शन योजना, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा आणि महिला शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडचणी यांविषयी त्यांनी माहिती घेतली. शिक्षकांचे हे प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, खजिनदार बापूसाहेब शितोळे, सचिव पी. टी. पाटील, सोलापूर जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष रणवीर राऊत, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि बार्शी शहर भाजपचे शहराध्यक्ष महावीर कदम यांच्यासह शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. या दौऱ्यात आसावा दयानंद हायस्कूल, नीलकंठेश्वर हायस्कूल तसेच द मॉडेल विविधांगी प्रशाला व महाविद्यालय येथे भेटी देण्यात आल्या. या भेटींदरम्यान शिक्षकांचे हक्क, सन्मान आणि शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदलांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार गावडे यांनी व्यक्त केला. ब्रह्महोटगी महाराज शैक्षणिक संकुलात मुख्याध्यापक ढाले उपस्थित होते. कौस्तुभ गावडे यांनी आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेतली. आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि प्रचाराच्या पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षकांशी थेट संवाद, त्यांच्या प्रश्नांची जाण आणि ते सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा करण्याची भूमिका, या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राशी संवाद अधिक दृढ करण्यावर भर दिला. शिक्षकांचे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार या दौऱ्यातून त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.