रोटरी व भावसार व्हीजनचा कार्यक्रम

रोटरी व भावसार व्हीजनचा कार्यक्रम
Published on: 

PNE26W61894
फोटोओळ :
सोलापूर : जेन-झी ई-पोस्ट ऑफिस उपक्रमात सुकन्या समृद्धी खात्याचे पासबुक देताना हेमंत खडकेकर व मान्यवर.


जेन-झी ई-पोस्ट ऑफिसचा उपक्रम; २० मुलांना मोफत खाती
रोटरी मेट्रो व भावसार व्हिजनचा पुढाकार; सुकन्या समृद्धी, पीपीएफ खात्यांची सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २७ : रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो आणि भावसार व्हिजनतर्फे गुरुनानक नगर येथील नवीन ई-पोस्ट ऑफिसमध्ये ‘जेन-झी ई-पोस्ट ऑफिस’ संवाद-भेट उपक्रम घेण्यात आला. यावेळी समाजातील २० गरजू मुला-मुलींची सुकन्या समृद्धी आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची (पीपीएफ) खाती मोफत उघडून देण्याची घोषणा करण्यात आली.
प्रवर अधीक्षक डाकघर हेमंत खडकेकर यांनी लवकरच अतिजलद टपाल सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रवीण पतंगे, नितीन माळवदकर आणि मनोज क्षीरसागर यांच्या मुला-नातवंडांची सुकन्या समृद्धी व पीपीएफची प्रातिनिधिक खाती उघडण्यात आली.
यावेळी महेश नक्का, योगीन गुर्जर आणि मनोज क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत अंजुटगी यांनी प्रास्ताविक केले, तर भाग्यश्री सोमवंशी यांनी ई-सेवांची माहिती दिली. श्रीरंग रेगोटी यांनी आभार मानले. दिनेश काटकर, कल्लाप्पा गुरव, आशिष जवळकर, हर्षल माळवदकर, निशिकांत पुकाळे, विशाल खमीतकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com