

पुणे, ता. १५ : जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्या मार्फत हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा निविदा कालावधी राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आला आहे. ही कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी १० लाख रुपये ते २५ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा कालावधी आठ दिवस, तर २५ कोटी ते १०० कोटी रुपयांपर्यंतच्या कामांसाठीचा निविदा कालावधी १५ दिवसांचा केला आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर कामांचे कार्यारंभ आदेश ३० सप्टेंबर पूर्वी देणे बंधनकारक असल्यामुळे, ई-निविदा प्रक्रियेचा कालावधी अल्प करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी काढले आहेत. नव्या निर्णयानुसार १० लाख रुपये ते दीड कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कामांसाठी प्रथम निविदा सूचनेचा कालावधी आठ दिवस, दुसऱ्या सूचनेसाठी चार दिवस आणि तिसऱ्या सूचनेसाठी तीन दिवस राहणार आहे. दीड कोटी ते २५ कोटी रुपयांपर्यंतच्या कामांसाठीही अनुक्रमे ८, ४ आणि ३ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. २५ कोटी ते १०० कोटी रुपयांपर्यंतच्या कामांसाठी प्रथम निविदा सूचना १५ दिवस, दुसरी ७ दिवस आणि तिसरी निविदा सूचना ३ दिवस प्रसिद्ध करता येणार आहे. तर १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या कामांसाठी अनुक्रमे २१ दिवस, ११ दिवस आणि ३ दिवसांचा कालावधी राहणार आहे. ही सवलत सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिनस्त विविध खातेप्रमुखांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कामांना लागू राहणार आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाची माहिती देऊन संबंधित कामे निर्धारित मुदतीत पूर्ण होतील, याची दक्षता घेण्याचे आदेश ही शासनाने दिले आहेत.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.