

मासे खाण्यावर बंदी हा
भाजपविरुद्ध खोटा प्रचार
मंत्री दिलीप घोष यांची ममतांवर टीका
कोलकता, ता. १० : ‘‘पश्चिम बंगालमधील नवनियुक्त मंत्री दिलीप घोष यांनी रविवारी कोलकता येथे आयोजित मत्स्य उत्सवात सहभाग घेतला. भाजप सत्तेत आल्यास मासे आणि मांस खाण्यावर बंदी आणेल,’’ असा खोटा प्रचार माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान केल्याची टीका घोष यांनी यावेळी केली.
माणिकतला भागात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे नवनियुक्त आमदार तापस रॉय उपस्थित होते. घोष म्हणाले, की बॅनर्जी यांनी प्रचारादरम्यान लोकांची दिशाभूल करण्यासाठी असत्य माहिती पसरवली आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दीदींचा संपूर्ण प्रचार खोट्या माहितीवर आधारित होता, मात्र राज्यातील जनतेने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आमदार तापस रॉय यांनीही तृणमूल काँग्रेसवर टीका केली. मागील सरकारने मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे बंगालला इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागत आहे, असे ते म्हणाले. भाजप सरकार राज्याला मत्स्य उत्पादनात पुन्हा स्वावलंबी बनवेल अशी ग्वाही त्यांनी दिली. खाद्य संस्कृतीवर निर्बंध लादण्याच्या दाव्यावर बोलताना रॉय म्हणाले की, नवीन सरकार आल्यापासून असे काहीही घडलेले नाही, बाजारपेठांतील स्थितीवरून हे स्पष्ट होते. बंगालच्या परंपरेत मासे आणि भात यांचे महत्त्वाचे स्थान असून, भाजप ही संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे घोष यांनी स्पष्ट केले. या उत्सवासाठी सुमारे दोन हजार नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.