तालुकास्तरीय स्पर्धेत २१० शाळा सहभागी
पिरंगुट, ता. २६ : कासार आंबोली (ता. मुळशी) येथील प्राथमिक शाळेत शनिवारी (ता. २०) तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. यात चार बीटमधील २१० शाळांच्या १००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
धावणे, गोळाफेक, थाळीफेक, उंच उडी, लांब उडी, कबड्डी, खो- खो, भजन, लोकनृत्य, लेझीम, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, कविता गायन, लंगडी, बुद्धीबळ तसेच आट्यापाट्या आदी स्पर्धा पार पडल्या. यशस्वी संघांना व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धानिहाय प्रथम विजेते विद्यार्थी व कंसात त्यांच्या शाळा -
मोठा गट वैयक्तिक : वक्तृत्व - पूर्वा खेडेकर (सुतारवाडी). धावणे - १०० मीटर - सुभाष पासवान (नांदे), वर्षाराणी बिरादार (भुकूम). धावती उंच उडी - अभिराज मालपोटे (कातरखडक), साक्षी केदारी (माताळवाडी). धावती लांब उडी - सुभाष पासवान (नांदे), नेहा दहिभाते (चाले). प्रश्नमंजूषा - गौरी टोपारे व गोपाळ नीलवर्ण (माण). बुद्धीबळ - आदर्श मोरे (पिरंगुट). पोवाडा - सार्थक पवार (बोतरवाडी). गोळाफेक - कृष्णा लोथी (हिंजवडी). अंजली पवार (वांद्रे). थाळीफेक - ऋषिकेश शेडगे (दासवे), संध्या स्वामी (सुतारवाडी). गायन -आदर्श राठोड (ताथवडे).
सांघिक : लोकनृत्य - भूगाव शाळा क्रमांक १. भजन - हिंजवडी. लेझीम - लवळे (मुले व मुली). खोखो - हिंजवडी (मुले), उरवडे (मुली). कबड्डी - नांदे (मुले), लवळे (मुली). लंगडी - मुलखेड. कविता गायन - बोतरवाडी. आट्यापाट्या - जांबे (मुले). भूगाव शाळा क्रमांक २ (मुली).
लहान गट वैयक्तिक - वक्तृत्व - ज्ञानेश्वरी कुडले (जातेडे). ५० मीटर धावणे - वैभव भारती (साखर कारखाना), वृषाली वाघमारे (मुळशी कॅंप). धावती उंच उडी - अभिराज मालपोटे (कातरखडक), रूपाली जाधव (गडदावणे). धावती लांब उडी - तुळशीदास घटवार (मुठा), रूपाली जाधव (गडदावणे). प्रश्नमंजूषा - स्वरा कचरे व शिवराज कचरे (गोठे). बुद्धीबळ - आदर्श गवई (माण). लिंबू चमचा - आयुषकुमार रॅाय (बोतरवाडी), शर्वरी तापकीर (मुलखेड). बेडूक उड्या - मनीष वाशिवले (भुकूम), आरू रणसिंग (बोडकेवाडी). बडबडगीते - पिरंगुट शाळा. गायन - देवांश शेळके (शेळकेवाडी). वेषभूषा - त्रिशिका राठोड (शिळेश्वर).
सांघिक - लोकनृत्य - पिरंगुट. भजन - लवळे. लेझीम - पिरंगुट (मुले), लवळे (मुली). खो-खो - उरवडे (मुले), मुलखेड (मुली). लंगडी - मुलखेड. कविता गायन - माले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

