

परिंचे, ता. १० : बहिरवाडीला (ता. पुरंदर) पुरंदर पंचायत समितीतर्फे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. गावाला दररोज २४ हजार लिटर पाणी विहिरीत सोडले जात आहे, अशी माहिती माजी सरपंच दशरथ जानकर यांनी दिली आहे.
उन्हाळ्यात बहिरवाडी गावात पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष जाणवते. यंदा विहिरीने लवकर तळ गाठल्याने गावात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. विहीर कोरडी पडल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. गावा शेजारच्या विहिरी, झरे या ठिकाणाहून पाणी आणावे लागत होते.
दरम्यान, तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गावची पाहणी करून तातडीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असून बहिरवाडी गावठाण, बापदेव वस्ती, मकाळ वस्ती, कोकरे वस्ती येथील सातशे लोकसंख्येला तसेच दोन हजार पशुधनाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे, असे उपसरपंच शरद पढेर यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल भगत उपस्थित होते.
माजी सरपंच दशरथ जानकर, उपसरपंच शरद पढेर यांनी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे तसेच सभापती अमित झेंडे यांना पाण्याची कमतरता असल्याची माहिती दिली. गावात टॅंकर सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने टॅंकरचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रल्हाद धानवले, बाळू शेलार, ओमकार पानसे, काशिनाथ वांभिरे, किरण चिव्हे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
03037
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.