पाटण, विक्रमसिंह पाटणकर वाढदिवस लेख

पाटण, विक्रमसिंह पाटणकर वाढदिवस लेख

Published on

मा. श्री. विक्रमसिंह पाटणकर (दादा) वाढदिवस विशेष
...............................................................
लेख क्रमांक दाेन
........................


पाटणच्या विकासाचे रचनाकार ः
विक्रमसिंह पाटणकर

जे काम मंजूर केले, त्याचेच भूमिपूजन आणि उद्‌घाटनाची परंपरा चार दशके सांभाळणाऱ्या आणि शासकीय योजनांच्या चाकोरीला तोडून पर्यटन, पवन ऊर्जा प्रकल्प, धरणे, साखर कारखाना या नवीन प्रकल्पाला चालना देत तालुका विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा विकासातील वाटा नेहमीच मैलाचाच दगड ठरतो. १९८३ ते २०१४ हा तालुक्याचा कालावधी माजी मंत्री पाटणकर यांनी कर्तृत्वाने विकासाच्या शिखरावर नेला, त्या सुवर्णकाळातील विकासाचे रचनाकार माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (दादा) यांचा आज (शनिवार) ८२ वा वाढदिवस. त्यानिमित्त...


-जालिंदर सत्रे, पाटण


विधानसभेचे सहा विजय, दोन स्वतःचे व तीन चिरंजीव सत्यजितसिंहांचे पराजय पचविलेल्या आणि कोरोना काळातही जनतेशी प्रत्यक्ष नसला, तरी इतर माध्यमातून संवाद साधताना कोरोनालाही चार हात दूर ठेवले. हल्ली काम कमी आणि ढोल-ताशे व नगारे, तुताऱ्यांचा आवाज जास्त, असे राजकीय वातावरण पाहावयास मिळते; पण राजकीय वाटचालीत दादांनी शब्दांचे जिव्हारी लागणारे बाण कधीही न मारता राजघराण्याची प्रतिष्ठा सांभाळली.
राजकीय आरोप-प्रत्यारोपात स्वतःपेक्षा विरोधकांच्या कपड्यावर डाग पडणार नाही, याची कायम दक्षता घेतली. कोणतेही पाठबळ नसताना महाराष्ट्राचे पोलादी पुरुष असा राज्यभर दबदबा असणाऱ्या लोकनेत्यांच्या नेतृत्वाला सामान्य जनतेच्या पाठिंब्याने आव्हान देऊन सलग पाच वेळा व एकूण सहा वेळा विधानसभा निवडणूक जिंकण्याची किमया करताना स्वतःतील सुसंस्कृतपणाला गालबोट लावले नाही. त्यांचा पहिला विजय विरोधकांना सहानुभूतीची लाट असतानासुद्धा मिळाला. मात्र, त्यानंतरचे सर्व विजय ही त्यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती होती. मोजके बोलताना कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देण्याचे मोठे मन दादांच्याकडे असल्याने पवनऊर्जा प्रकल्प व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व पर्यटनाच्या धोरणावर अनेक वावटळे उठली. मात्र, कधीही तोल जाऊ दिला नाही. आपल्या राजकीय जीवनात अनेक राजकीय चढ-उतार दादांच्या आयुष्यात आले. ८०० च्या आसपास गावे व छोट्या-छोट्या वाड्यावस्त्यांत विखुरलेल्या जनतेला दादांनी विकास प्रवाहात आणले. पायवाटांचे डांबरी रस्ते झाले की नाही, हे चार तास पायपीट करून पाटणला येणाऱ्या वनकुसवडे पठारावरील जनतेलाच माहीत आहे. सडावाघापूर, जळव, दाढोली, विरेवाडी, वनकुसवडे, हुंबरळी व वाल्मीक पठारावरील सणबूर-रुवले हे घाटरस्ते, निसरे, तारळे, संगमनगर धक्का, मुळगाव, हेळवाक येथील कोयना नदीवरील व मोरगिरी, आडदेव व बनपुरीसारखे मोठे पूल दादांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. तारळी, मराठवाडी, महिंद, चिटेघर, वांग, उत्तर मांडसारखे धरण प्रकल्पांमुळे या परिसरातील शेती हिरवीगार झाली. पवन ऊर्जा प्रकल्प व कोयना पर्यटन यातून दादांची व्यावसायिक राजकारणी अशी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. पाटणची भाजी मंडई, जनावरांचा दवाखाना, पंचायत समितीची प्रशासकीय इमारत, नेहरू उद्यान व लोकनेत्यांच्या कार्याला शोभेल अशी बाळासाहेब देसाई महाविद्यालयाची इमारत त्यांच्या उत्तुंग कार्याची ओळख देतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सज्ज असलेला कोयना शुगर केन हा नविन साखर कारखाना ही संकल्पना सत्यात उतरण्यासाठी आजही ८२ वर्षाचा तरुण धडपडतोय, ही सामाजिक भावना आज दूरवर दिसत नाही. कल्पक कार्यकर्तृत्वाने पाटणच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या दादांना जनतेची सेवा करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा...

--------------------------

फाेटाे

विक्रमसिंह पाटणकर
..............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com