राजुरी येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात, महिलांना विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन
राजुरीत महिलांचा सक्षमीकरण मेळाव्यास प्रतिसाद
राजाळे, ता. २९ : राजुरी (ता. फलटण) येथील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी गावातील महिलांसाठी महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात झाला.
या मेळाव्यात महिला सक्षमीकरण व सबलीकरण याविषयी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली कांबळे यांनी मार्गदर्शन केले. आर्थिक लाभाच्या विविध शासकीय योजनांसाठी मार्गदर्शन करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कागदपत्रे गोळा करण्यात आली. त्याबरोबरच आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी विविध आर्थिक लाभाच्या योजनांविषयी माहिती देण्यात आली. शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनांसाठी निराधार महिलांचे फॉर्म भरण्यात आले असून, त्यांना लाभ मिळवून देणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
फलटणच्या बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शांताराम कारंडे यांनी कामगार नोंदणी व त्यापासून मिळणारे लाभ याबाबत माहिती दिली, तसेच पात्र लोकांचे अर्जही यावेळी भरण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख संदीप कांबळे, राजुरीचे सरपंच मनोहर पवार, उपसरपंच अनिता साळुंखे, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मारुती सांगळे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराज पाटील, भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब सांगळे, माजी सरपंच जयकुमार इंगळे, भारत गावडे, विठ्ठल खुरुंगे, माऊली जाधव, मफतलाल पवार, सोमनाथ गावडे, पोपट हगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. रमेश बागाव, पिंटू रणदिवे, अमोल बागाव, बापू बागाव यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
फोटो :.........00925
राजुरी (ता. फलटण) : महिलांना मार्गदर्शन करताना वैशाली कांबळे. (अमोल पवार : सकाळ छायाचित्रसेवा)
.......................................................

