फोटो : B10295
सातपूर : प्रभाग ११मध्ये पाहणी करताना सभापती समाधान देवरे, नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, मानसी शेवरे, सोनाली भंदुरे
--
नागरी समस्यांवर तातडीने कारवाईचे निर्देश
मॉन्सून टास्क फोर्सची प्रभाग ११ मध्ये पाहणी
सातपूर, ता. १६ : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या कमी करून परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आपत्तीमुक्त ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून मॉन्सून टास्क फोर्स हा उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील स्वारबाबानगर, सातपूर गाव आणि महादेवनगर परिसराची संयुक्त पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, सोनाली भंदुरे आणि मानसी शेवरे यांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दौऱ्यात प्रामुख्याने पावसाचे पाणी साचणाऱ्या जागा, ड्रेनेजची समस्या, अतिक्रमणामुळे निर्माण होणारे अडथळे, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता आणि मलेरियाचा वाढता धोका यासारख्या नागरी समस्यांची सविस्तर माहिती घेण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची नोंद घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश लोकप्रतिनिधींनी दिले. या संयुक्त पाहणीत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूूलन विभाग, ड्रेनेज विभाग, मलेरिया विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते रवी काळे, विजय भंदुरे, तुषार तुषारे, चंद्रकिशोर मुंदडा यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.