SGR26B07301
नरडाणा : राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार करताना मान्यवर.
---------
विकासकामांना सर्वोच्च
प्राधान्य : जयकुमार रावल
सोनगीर, ता. १६ : जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य असून, विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
राष्ट्रीय बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण माजी राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, पिंपळनेर नगराध्यक्षा डाॅ. योगिता चौरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ज्योती बोरसे, पंकज कदम, संग्राम पाटील, माजी सरपंच शिवप्रिया सिसोदे, कल्पना सिसोदे, प्रफुल्ल सिसोदे, आशुतोष पाटील, नथ्थू वारूडे, प्रभाकर पाटील, विरेंद्रसिंग गिरासे, भुपेंद्रसिंग गिरासे, जिजाबराव सोनवणे, डाॅ. दीपक बोरसे, विश्वनाथ पाटील, डी. एस. गिरासे, डाॅ. आर. आर. पाटील, विलास शिंदे, मोतीलाल वाकडे, दगेसिंग गिरासे, साहेबराव गोसावी, उदय देसले, मनोहर पाटील, दादा मराठे, चेतन परमार, उल्हास देशमुख, प्रकाश देसले आदी उपस्थित होते. सत्यजित सिसोदे यांनी प्रास्ताविक केले. विनित सिसोदे यांनी आभार मानले. निवृत्त अभियंता मधुकर सिसोदे व शिंदखेडा तालुका खरेदी- विक्री संघाच्या सभापती माधुरी सिसोदे यांनी संयोजन केले.