हंगिरगे विद्यालयाची श्रुती सावंत घेरडी केंद्रात प्रथम

हंगिरगे विद्यालयाची श्रुती सावंत घेरडी केंद्रात प्रथम
Published on

हंगिरगे विद्यालयाचा निकाल ९२ टक्के
सांगोला, ता. ९ : कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील विद्यालय, हंगिरगे (ता. सांगोला) विद्यालयाने मार्च २०२६ च्या एस.एस.सी. परीक्षेत उज्वल यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९२ टक्के लागला असून श्रुती मारुती सावंत हिने ९२ टक्के गुण मिळवत विद्यालयात तसेच घेरडी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेत सृष्टी भागवत लांडगे हिने ८५.६० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर प्रीती भारत गावडे हिने ८२.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच सोनम विलास सावंत हिने ७९ टक्के गुण मिळवत चौथा, तर प्रज्ञा अण्णासो गायकवाड हिने ७६.४० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com