शिंदखेडा आगारातून लांब पल्ल्याच्या रातराणी बससेवा सुरू करण्याची भाजपची मागणी

शिंदखेडा आगारातून लांब पल्ल्याच्या रातराणी बससेवा सुरू करण्याची भाजपची मागणी
Published on
(लोगो : एसटीचा घेणे) ----------------- शिंदखेड्यातून रातराणी बससेवा सुरू करा भाजपच्या शिष्टमंडळाची आगारप्रमुखांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. १६ : शिंदखेडा बसस्थानकावरून अहमदाबाद, इंदूर, मुंबई, कल्याण आणि पुणे या प्रमुख शहरांसाठी लांब पल्ल्याच्या रातराणी बससेवा तसेच रेल्वे प्रवाशांसाठी कनेक्शन बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिंदखेडा शहर भाजपतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आगार व्यवस्थापकांना देण्यात आले. शिंदखेडा शहरासह तालुक्यातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि सर्वसामान्य प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, विविध कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना अहमदाबाद, इंदूर, मुंबई, कल्याण आणि पुणे या शहरांमध्ये नियमित प्रवास करावा लागतो. मात्र, शिंदखेडा बसस्थानकावरून या शहरांसाठी थेट रात्रीची बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना धुळे, शिरपूर अथवा इतर ठिकाणी जाऊन बस पकडावी लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, शिंदखेडा रेल्वे स्थानकावरून रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कनेक्शन बससेवा सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार शिंदखेडा रेल्वे स्थानकावरून सकाळी ९ व ९.३० वाजता शिरपूर आणि धुळ्याकडे बससेवा सुरू करावी. तसेच, धुळे व शिरपूर येथून सकाळी ६ व ८ वाजता शिंदखेडा रेल्वे स्थानकापर्यंत कनेक्शन बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने शिंदखेडा बसस्थानक ते धुळे रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे चारला विशेष रेल्वे कनेक्शन बस सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या वेळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दादा मराठे, उपनगराध्यक्ष उदय अरुण देसले, नगरसेवक मनोहर पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com