गायत्री ज्योती कलश यात्रा

गायत्री ज्योती कलश यात्रा

Published on

SLC25B27751
सोलापूर : सुशील रसिक सभागृहात गायत्री ज्योती कलश यात्रा आल्यानंतर स्वागत करताना डॉ. सूर्यप्रकाश कोठे, ओमजी दरक.

SLC25B27752
(दुसऱ्या छायाचित्रात) : गायत्री मंदिरात ठेवलेला गायत्री ज्योती कलश.

हरिद्वारची ‘अखंड दिव्य ज्योत’ सोलापुरात
शंभर वर्षांच्या महातपश्चर्येचा जागर; १८० देशांना विश्वशांतीची साद

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : माणसात देवत्व जागे करणे आणि पृथ्वीवर स्वर्गाचे अवतरण करणे, हा उदात्त विचार घेऊन अखिल विश्व गायत्री परिवार, शांतिकुंज हरिद्वार यांच्या वतीने आयोजित केलेली ‘गायत्री ज्योती कलश यात्रा’ सध्या सोलापूर नगरीत भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही यात्रा शहराच्या विविध भागांत भ्रमण करत असून, आतापर्यंत तब्बल २००० हून अधिक भाविकांनी या दिव्य ज्योतीचे दर्शन घेऊन गायत्री मंत्राचे माहात्म्य अनुभवले.
ज्या अखंड दीपकाने १९२६ पासून अविरत जळत राहून जगाला मानवतेचा संदेश दिला, तोच ‘गायत्री ज्योती कलश’ सध्या सोलापूर नगरीत आपल्या तेजाने भक्तांना मंत्रमुग्ध करत आहे. अखिल विश्व गायत्री परिवार, शांतिकुंज (हरिद्वार) यांच्या वतीने निघालेल्या या महायात्रेने लक्ष्मीनारायण मंदिर, धूत सारीज, सुशील रसिक सभागृह, बाळे येथील ब्रह्मपुरी सोसायटी येथे आपला आध्यात्मिक दरवळ पसरवला आहे. तब्बल २ हजारांहून अधिक सोलापूरकरांनी या दिव्य ज्योतीचे दर्शन घेऊन ‘माणसात देवत्व’ जागविण्याचा संकल्प केला आहे.
-----
शतकाच्या महासंकल्पाचे १८० देशात आमंत्रण
​ही केवळ यात्रा नसून २०२६ मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक त्रिवेणी शताब्दी महोत्सवाचा शंखनाद आहे. अखंड दीपकाची १०० वर्षे, गुरुदेवांच्या तपश्चर्येची १०० वर्षे आणि वंदनीय माताजींचे जन्मशताब्दी वर्ष अशा अलौकिक सोहळ्यासाठी जगभरातील १८० देशांना आमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यासाठी ३० देशांमधून स्वतःचे ज्योती कलश हरिद्वारला येणार आहेत.
------
सोलापुरात सेवेकऱ्यांचा भक्ती कुंभ
​या दिव्य यात्रेचा रथ हरिद्वारचे सेवेकरी शैलेंद्रभाई पटेल, नीलाबेन पटेल, बी. एम भोयर, समर्थपणे पुढे नेत आहेत. सोलापुरात या यात्रेला यशस्वी करण्यासाठी यांसारख्या समर्पित शिवधनुष्य पेलणाऱ्या सेवेकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
---------- -------- --------
कोट
SLC25B27750
सनातन संस्कृतीचा जागर हा केवळ धार्मिक नसून हिंदू समाजाला जागृत करणारी वैचारिक क्रांती आहे. गायत्री मंत्राचा प्रचार व प्रसार करण्यासोबतच भारताच्या विश्वगुरू होण्याच्या दिशेने पडलेले हे पाऊल आहे.
- कैलास चंद्र विश्वकर्मा, कलश यात्रेतील सेवेकरी


Marathi News Esakal
www.esakal.com