बागलाण तहसील निवडणूक बैठक

बागलाण तहसील निवडणूक बैठक
Published on
मतदारांनी स्वतःचा अचूक माहीती भरावी ः चावडे सकाळ वृत्तसेवा सटाणा ता.१५ : भारत निवडणूक आयोगातर्फे सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमात मतदारांनी स्वतःचा अर्ज स्वतःच अचूक भरून द्यावी असे आवाहन बागलाणचे मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे. मतदारांनी बीएलओकडून फॉर्म घेऊन किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक माहिती अचूक भरून तो निर्धारित मुदतीत संबंधित बीएलओकडे जमा करावा. फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे व माहिती योग्य प्रकारे नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एसआयआर कार्यक्रमांतर्गत अर्ज निर्धारित मुदतीत आणि अचूक माहितींसह सादर न केल्यास संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःहून पुढाकार घेऊन फॉर्म भरावा. असे आवाहान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com