पुणे
कदमवाडी ओझर्डे येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
कदमवाडीत शनिवारी
रक्तदान शिबिर
वाई, ता. २९ : कदमवाडी (ओझर्डे) येथे शाकंभरी पौर्णिमा निमित्ताने शनिवारी (ता. ३) सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर, सर्व महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण शिबिर अशा विविध आरोग्यविषयक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे आयोजन प्रति अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, कदमवाडी (ता. वाई) यांच्या वतीने करण्यात आले असून, यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी व बेल एअर ब्लड सेंटर, वाई यांचे सहकार्य लाभले आहे.
---------------------

