

नंदिकेश्वरच्या १३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण
उपळाई बुद्रुक, ता. ९ : उपळाई बुद्रूक येथील नंदिकेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी परीक्षेत विक्रमी यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या स्थापनेपासून प्रथमच तब्बल १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९८.४१ टक्के लागला असून परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रावणी लोंढे हिने ९७.२० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तिने माढा केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. समीक्षा नामदेव अर्जुन हिने ९५.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच सिद्धी संतोष शिंदे (९४.८० टक्के), ऋतुजा दत्तात्रेय शिंदे (९२.८० टक्के), स्वप्नाली नामदेव शिंदे (९२.२० टक्के), प्रमोद बालाजी वाकडे (९२.२० टक्के), प्रांजली सिद्धेश्वर मोरे (९१.८० टक्के), समृद्धी संदीप कुलकर्णी (९१.८० टक्के), सिद्धी बप्पासाहेब यादव (९१.८० टक्के), निरंजन गोरख वाकडे (९१.८० टक्के), तेजश्री धोंडीराम लोंढे (९१.८० टक्के), सारंग शशिकांत नकाते (९०.८० टक्के) आणि कोमल शहाजी नागटिळक (९०.४० टक्के) यांनी विशेष यश संपादन केले. यंदा विद्यालयातून १२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ५५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.