कुलपावर कुलूप लावल्याने
घरमालकावर गुन्हा दाखल

कुलपावर कुलूप लावल्याने घरमालकावर गुन्हा दाखल

Published on

वाघोली, ता. १९ ः भाडेकरूला कोणतीही माहिती न देता कुलूप लावून सदनिकेमध्ये राहण्यास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदनिकामालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वकील धम्मपाल होके यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी येथील गजानन रासकर यांच्या सदनिकेमध्ये धम्मपाल होके जुलै २०२३ पासून भाड्याने रहात आहेत. रविवारी (ता. १७) होके व कुटुंबीय घराबाहेर गेले असताना रासकर यांनी कुलपावर कुलूप लावले होते. याबाबतची माहिती रात्री समजल्यानंतर घरात संसारोपयोगी साहित्य असताना कोणतीही माहिती न देता कुलूप लावून सदनिकेमध्ये राहण्यास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी होके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रासकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com