दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

वाघोली, ता. २ ः दोन दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत तीनजण मृत्युमुखी पडल्याची गंभीर घटना अष्टापूर फाटा (ता. हवेली) येथे शनिवारी (ता. १) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये सहा वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा समावेश आहे.
प्रवीण सुनील पाटोळे (वय २८) व त्यांचा मुलगा राजवीर (वय ०६, दोघे रा. अष्टापूर ता. हवेली) व यश शेखावत (वय २१, रा न्हावी फाटा, शिंदे पोल्ट्री फार्म जवळ) हे तिघेजण मृत्युमुखी पडले. याप्रकरणी अक्षय अनिल पाटोळे (वय २९ रा-अष्टापूर ता. हवेली) यांनी फिर्याद दिली.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोळे हे मुलासह दुचाकीवर अष्टापूर फाटा येथे दूध घालून घरी जात होते. या वेळी समोरून यश हा अतिवेगात दुचाकीवरून येत होता. अष्टापूर फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये प्रवीण हे जागीच मृत्यूमुखी पडले. तर राजवीर हा उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. तर दुसरा दुचाकीधारक यश हा पुण्यात उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. याप्रकरणी हयगयीने वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने यश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने अष्टापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com