पी. एस. आदर्श विद्यालयात 
विठ्ठल नामाची शाळा भरली!

पी. एस. आदर्श विद्यालयात विठ्ठल नामाची शाळा भरली!

Published on

खराडी, ता. ८ ः खराडी येथील पी. एस. आदर्श विद्यालयात वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठुनामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा रंगला. विद्यालयात पालखीचे व विठ्ठलाचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री शेडोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दिंडीत परिसरातील पालकही सहभागी झाले होते. पालकांच्या सहभागातून भक्तिमय वातावरणात बाल चिमुकल्यांनी फुगडी खेळत टाळांच्या गजरात श्री ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज व विठुरायाच्या नामाचा जयघोष केला.
याप्रसंगी पालखी सोहळ्यातून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. वृक्षसंवर्धन प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण सोहळ्यामध्ये उज्ज्वला गायकवाड, रामदास वायभासे, सचिन गंभिरे सहभागी झाले होते.

खराडी ः पी. एस. आदर्श विद्यालयात पालखीसोबत वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले व पालक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.