

मोहिनी मोहिते
कँटोन्मेंट, ता. २७ : एकीकडे शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण होत आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या शाळांची स्थिती विदारक असल्याचे वास्तव समोर येत आहे. भवानी पेठेतील क्रांतिवीर लहुजी वस्ताद शाळेत मराठी, इंग्रजी, उर्दू अशा तिन्ही माध्यमांच्या शाळा आहेत. मात्र या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत कचरा आणि किटलेल्या जिन्यांद्वारे होते. शाळेत वर्गखोल्या विविध ठिकाणी असणाऱ्या तुटक्या वस्तूंमुळे ही शाळा आहे की ‘भांगराचे गोडावून’ असा प्रश्न पडत आहे.
शाळेच्या कानाकोपऱ्यात कचरा, मोडकळीस आलेल्या खिडक्या, तुटलेले बाक आणि कपाटे टाकण्यात आल्याचे दिसून येते. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीत रद्दी आणि बंद पडलेली उपकरणे अस्तावस्त पडलेली आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळात कोरोना बाधितांना राहण्यासाठी या शाळेत व्यवस्था करण्यात आली होती. गाद्या, चादरी, बेड, सॅनिटायझर स्टँड अशा वस्तू शाळेत ठेवण्यात आल्या होत्या. आता कोरोना काळा संपून तीन वर्षे लोटली तरीही अद्याप या वस्तू शाळेच्या वर्गात धूळ खात पडल्या आहेत. याशिवाय मोफत गणवेश योजनेचा लाभ शाळेतील काही विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेला नसल्याचे दिसून आले.
शाळेत फेरफटका मारला असता, विद्यार्थी जमिनीवर अभ्यास करताना दिसले. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. याशिवाय शाळेचे मैदान संपूर्ण चिखलमय झालेले आहे.
स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था
शाळेतील स्वच्छतागृहात स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. वॉश बेसिनला पाइप नसल्याने घाणपाणी स्वच्छतागृहात ओसंडून वाहते. नळाची गळती, तुंबलेली शौचालये, वाहणारे सांडपणी, तुटलेले दरवाजे यामुळे स्वच्छतागृहांची अवस्था भीषण झाली असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुलींसाठी असलेले सॅनिटरी नॅपकिनचे नवे कोरे मशीन गेल्या वर्षभरापासून बंद आहे.
भंगार झालेले साहित्य काढण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच पुढील समस्यांची पाहणी करूनच यावर बोलू.’’
- शरद मेमाणे, प्रभारी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
जिन्याच्या खाली टाकण्यात आलेला कचरा व मोडकळीस आलेल्या खिडक्या, किट चढलेले जिने
2) शाळेच्या परिसरात पडलेला कचरा
3) पिण्याच्या पाणी ठिकाणी गंज लागलेली नळे व अस्वच्छता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.