महालक्ष्मी मंदिरासमोर श्रीसूक्त पठण

महालक्ष्मी मंदिरासमोर श्रीसूक्त पठण
Published on

पुणे, ता. ४ : नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्यादिवशी शुक्रवारी सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरासमोर
ॐ ॥ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१॥
अशा मंगलमय स्वरात महिलांनी पारंपारिक वेशात श्रीसूक्त पठण केले. याप्रसंगी पाच हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्या.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने सामुदायिक श्री सूक्त पठण कार्यक्रमाचे आयोजन मंदिरासमोर करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांच्यासह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेला हा आदिशक्तीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरु आहे. विश्वकर्मा विद्यापीठ आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. महालक्ष्मी मंदिरासमोर सोमवारी सकाळी ६ वाजता प्रसन्न वातावरणात सामुदायिकरीत्या श्रीसूक्त पठण करण्यासाठी महिला एकत्र आल्या होत्या. त्यानंतर ध्यानधारणेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी ॐकार, शंखनाद आणि श्रीगणेश अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक श्रीसूक्त पठणाला सुरुवात झाली.
शंखनाद, मंत्रोच्चार आणि श्री सूक्तपठणातून चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. फलश्रुती आणि आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. विश्वकर्मा विद्यालयाच्या पथकातील विद्यार्थ्यांनी ढोलवादन आणि केशव शंखनाद पथकाने शंखनाद केला. सायंकाळी पाच वाजता महापालिकेतील विविध महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रात्री साडेआठ वाजता शिवपार्वती विवाहसोहळा या सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्याच्या दिवशी (ता. १२) रावनदहनाचा कार्यक्रम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com