पर्यटनाला चालना मिळाल्याने
रोजगारात वाढ ः तापकीर

पर्यटनाला चालना मिळाल्याने रोजगारात वाढ ः तापकीर

Published on

खडकवासला, ता. १७ : ‘सिंहगडाचा मला नेहमीच अभिमान आहे, तोरणा, राजगड, पानशेत, वरसगाव, कोंढणपूर, खेडशिवापूर या ऐतिहासिक, पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण, डांबरीकरण केले, जिल्हा नियोजांच्या निधीतून सिंहगड घाट रस्ता, दरडी पडू नये म्हणून जाळ्या बसविल्या, गोळेवाडी ते आतकरवाडी (सिंहगड पायथा) रस्ता काँक्रिटचा केला, परिणामी पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. गोऱ्हे बुद्रुक ते खानापूर, डोणजे, पायगुडेवाडी परिसरात हॉटेलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खडकवासला धरणालगतच्या कुडजे ते बहुली रस्त्याचे काम झाल्याने येथे देखील परिसरात हॉटेलची संख्या वाढली. यामुळे स्थानिक नागरिकांचा रोजगार वाढल्याचे महायुतीतील भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी बिबवेवाडी येथे बोलताना सांगितले.

तापकीर यांनी गणेशनगर, सह्याद्रीनगर, आदर्शनगर, राजमुद्रा, ओंकारपार्क, राघवनगर, केशव कॉम्प्लेक्स, पंचरत्न, श्रीमंगल, नर्सेसटाऊन, संभाजीनगर, वनराई परिसरात नागरिकांशी संवाद साधला

सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी,‌ तसेच गड संवर्धनासाठी महापालिकेच्या माध्यमातून निधी आणला. पुरातत्त्व, वनविभाग, पर्यटन विकास, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिंहगडाचा सर्वांगीण विकास आराखड्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला, जांभली येथील श्रीक्षेत्र निळकंठेश्वर, धायरी येथील श्री धारेश्वर, कोंढणपूर येथील श्री तुकाईमाता मंदिर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी पर्यटन विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून प्रत्येकी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी आणला. धरण परिसरात साडेतीन कोटी खर्चून ऑक्सिजन पार्कचे काम सुरू आहे, असेही तापकीर यांनी या वेळी नमूद केले.


या वेळी माजी नगरसेविका वर्षा तापकीर, अश्विनी भागवत, मोहिनी देवकर, अप्पा धावणे, संतोष फरांदे, विश्वास आहेर, युवराज रेणुसे, अभिषेक तापकीर, सचिन बदक, सागर साबळे, आनंद शिंदे, दत्ता सावंत, अंकुश सोनवले, महेश भोसले, सत्यवान कामठे, सतीश घाटे, उल्हास खुटवड आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान,
================

ociated Media Ids : UPN24B61257

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com