कायदा, सुव्यवस्थेबाबत 
‘खडकवासला’त बैठक

कायदा, सुव्यवस्थेबाबत ‘खडकवासला’त बैठक

Published on

सिंहगड रस्ता, ता. १९ : खडकवासला मतदारसंघासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वडगाव सिंहगड महाविद्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा तपशील सांगितला. बैठकीत मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षा उपायांवरदेखील सखोल विचार केला गेला. या वेळी सर्व मतदान केंद्रांच्या व्यवस्थापन, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि इतर आवश्यक गोष्टींची समीक्षा करण्यात आली. या बैठकीत विविध पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com