सिंहगड रस्ता परिसरात स्वच्छतागृहे जळून खाक
सिंहगड रस्ता, ता. १० : येथील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अचानक लागलेल्या आगीत फायबरची फिरती सार्वजनिक स्वच्छतागृहे जळून खाक झाली. सोमवारी (ता. १०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ही स्वच्छतागृहे वडगाव जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला शिंदे मैदानाजवळील मोकळ्या जागेत ठेवण्यात आली होती. या ठिकाणी नागरिक वारंवार कचरा टाकतात. अज्ञात व्यक्तीने कचरा पेटवून दिला. आग वाढत गेल्याने जवळच असलेल्या स्वच्छतागृहांनी पेट घेतला. आगीने रौद्र रूप धारण केल्याने ज्वाळा मोठ्या प्रमाणावर येत होत्या. याबाबत माहिती मिळताच सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलिस हवालदार सचिन गायकवाड, धनंजय गिरीगोसावी, शीला जाधव, बीट मार्शल आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहे वाचविण्यासाठी बराच प्रयत्न केले. काही स्वच्छतागृहे त्यांना वेळीच बाजूला करता आली. काही स्वच्छतागृहे आगीत भस्मसात झाली. आनंदनगर आणि नवले अग्निशामक केंद्राच्या जवानांनी चार बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

