औंधमधील कोंडी फोडण्यासाठी 
उपाययोजना करणार : मनोज पाटील

औंधमधील कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना करणार : मनोज पाटील

Published on

औंध, ता. २२ : ‘‘औंध परिसरात वाहतुकीचा भार प्रचंड वाढत आहे. मेडीपॉईंट चौकात सिग्नल आवश्यक असून सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर झाला पाहिजे. नागरिकांनी ‘पीटीपी’ ॲपच्या माध्यमातून दुहेरी पार्किंग व अतिक्रमणांचे फोटो पाठवावेत, या माध्यमातून संबंधितांवर कारवाई केली जाईल,’’ असे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. ‘औंधसाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबवून ‘औंध पॅटर्न’ तयार करून महिन्यात आढावा घेऊ. त्यासाठी पोलिस व वॉर्डनची संख्या वाढवण्यात येईल, असेही ते म्हणाले.
औंध परिसरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगबाबत तोडगा काढण्यासाठी आज औंध येथील गोपीनाथ मुंडे सभागृहात मनोज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस वाहतूक विशेष पोलिस महानिरीक्षक (गुप्तवार्ता) राजेंद्र डहाळे, विभागाचे उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त नंदिनी वग्याणी, नगर नियोजनकार प्रसन्न देसाई, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, सहायक आयुक्त गिरीश दापकेकर, वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, वाहतूक पोलिस निरीक्षक मीनल पाटील, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, ॲड. मधुकर मुसळे, उपअभियंता रमेश वाघमारे, कनिष्ठ अभियंता स्वाती गणपिल्ले, उपअभियंता रणजित मुटकुळे, कनिष्ठ अभियंता कामायनी घोलप, मयूर मुंडे, विनय शामराज, प्रशांत शितूत यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी नागरीकांनी वाहतूक कोंडी, अतिक्रमणासंदर्भात समस्या मांडत सूचना केल्या. खलाटे यांनी परवान्याच्या अटींचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

नागरिकांनी केलेल्या सूचना
- मेडीपॉईंट चौकात सिग्नल बसवा
- शालेय वाहने शाळेच्या आवारात लावा
- अतिक्रमण हटाव मोहिमेस वेग द्या
- वेस्टएंडबाहेर पडणाऱ्या वाहनांची दिशा बदला
- नागरस रस्त्याचे रुंदीकरण करा
- पालिकेच्या पार्किंगचा अधिक वापर व्हावा
- खासगी आस्थापनांनी सहकार्य करावे
- आयटीएमएस प्रणालीचा वापर करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com