सिंहगडावरील बेपत्ता तरुण 
चार दिवसांनी आढळला

सिंहगडावरील बेपत्ता तरुण चार दिवसांनी आढळला

Published on

खडकवासला, ता. २४ ः सिंहगडावर बुधवारी बेपत्ता झालेला तरुण तब्बल शंभर तासांनी
सुखरूप आढळला. गौतम आदिनाथ गायकवाड (वय २४, रा. हैदराबाद, तेलंगण) असे त्याचे नाव असून, आज सायंकाळी सात वाजता सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीमागील परिसरात स्थानिक नागरिकांना तो आढळून आला.
गौतम सिंहगडावर सापडल्यावर स्थानिक नागरिकांनी त्याला सुरक्षितपणे खाली आणले. त्यानंतर खानापूर येथील १०८ रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती हवेली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.
गौतम हा मित्रांसोबत बुधवारी सिंहगडावर आला होता. मोबाईल मित्राकडे ठेवून, लघुशंकेसाठी तो गेला. मात्र, परत आला नाही. संध्याकाळी त्याची चप्पल कड्यालगत सापडल्याने मित्रांनी पोलिसांत तक्रार दिली. पाऊस व धुक्यामुळे अडथळे येत असूनही तीन दिवस त्याचा शोध घेण्यात आला.
आज पोलिस, नागरिक, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक व नातेवाइकांनी शोधमोहीम राबवली. सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत रॅपलिंगसह तलाव, कडे व गवताळ भाग तपासले गेले. मोहिमेत ६८ जण सहभागी झाले. मात्र, शोध थांबल्यानंतर चार तासांनी तो समाधीमागील परिसरात पर्यटकांना दिसून आला. त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. पर्यटकांनी ही माहिती स्थानिक नागरिकांना दिली. संजय गायकवाड, संगीता मंडले, गोपीनाथ गोफणे, मानव गायकवाड, विजय खाटपे, अमोल पढेर यांच्यासह अनेकांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. तो अत्यंत थकलेला, गारठलेला असून, अंगावर माराची चिन्हे होती, असे ग्रामस्थ संजय गायकवाड यांनी सांगितले.
========================
फोटोः 71600, 71601

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com