‘सरहद’कडून राजगडसह 
१३ गडांवर दीपोत्सव

‘सरहद’कडून राजगडसह १३ गडांवर दीपोत्सव

Published on

कात्रज, ता. १८ ः जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे या घोषणांनी दुमदुमलेल्या राजगडावर यंदाही दीपोत्सवाचा सोहळा पार पडला. ‘सरहद’तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वसुबारसच्या दिवशी राजगड दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सलग पंधरावे वर्ष असून, संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवप्रमुख मयूर मसुरकर मित्रपरिवाराने हा दीपोत्सव दिमाखात पार पाडला. यंदा राजगडसह एकूण १३ गडांवर दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवनेरीवर संजय भोईटे आणि सुधीर खारवे, तोरणावर विनायक पडवळ, रायरेश्वरवर अनिल सोनवणे, पुरंदरवर बाळासाहेब रूपनर, सिंहगडावर नीलेश पवळे, तिकोण्यावर संदीप कदम, अजिंक्यताऱ्यावर तुषार फरांदे, प्रतापगडावर प्रतीक खुटवड, केंजळगडावर तानाजी निंबाळकर, मल्हारगडावर सागर पारखी, रोहिडेश्वर गडावर प्रसाद मानकर, विठ्ठल पोळ, शंकर चौधरी आणि पेमगिरी किल्ल्यावर सुनील दिघे यांच्या नेतृत्वाखाली हा दीपोत्सव साजरा झाला.
या दीपोत्सवाचे मुख्य केंद्र असलेल्या राजगडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले. छावा प्रतिष्ठान सातारातर्फे विनोद भुजबळ यांनी मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. चंद्रकांत मांगडे युवा मंचच्यावतीने देवीचा जागर पारंपरिक पद्धतीने सादर करण्यात आला. रामनगरी हाउसिंग सोसायटीचे अनिल शिळीमकर यांनी अन्नदानाचे आयोजन केले होते. सिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र फरांदे यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. महाराणा प्रताप ढोल पथकाच्या युवकांनी आपल्या जोशपूर्ण सादरीकरण केले. यावेळी सचिन कोळी, गोपाळ कांबळे, अॅड. प्रशांत साळुंके, ‘सरहद’च्या प्राचार्या संगीता शिंदे, समन्वयक लेशपाल जवळगे, नीलेश भिंगारे यांच्यासह वाहतूक व्यवस्थापनात अमित सालेकर, गुलाब शिंदे आणि दयानंद सारोळकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com