शेवाळेवाडी, मांजरी परिसरात बिबट्याचे दर्शन
मांजरी, ता. १४ : मागील काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच गेल्या आठवड्याभरापासून फुरसुंगी, मांजरी, शेवाळेवाडी, वडकी या परिसरात बिबट्याचे दिवसाढवळ्याही दर्शन घडू लागल्याने शहराच्या उंबरठ्यावरील हा परिसरही आता त्याच्या भीतीने धास्तावला आहे.
गेल्या आठवड्यात फुरसुंगीजवळील सोनारपूल परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले होते. त्यानंतर दोन-तीन दिवसांतच मांजरी, शेवाळवाडी परिसरातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ भवरावस्ती भागात परवा रात्री व काल (ता. १३) दुपारी दीडच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना बिबट्या दिसल्याचे रहिवासी ओंकार घाडगे यांच्यासह काही नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर मांजरी चौकीचे पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे, विजयकुमार ढाकणे, तसेच वनरक्षक प्रिया अंकेन यांनी भवरा वस्ती या ठिकाणी भेट देऊन बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात पाहणी केली. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस व वनाधिकाऱ्यांनी केले आहेत. हा बिबट्या आता द्राक्ष संशोधन परिसरात दिसल्याचे महिला कामगारांनी सांगितले, तसेच काल रात्री अकरा वाजता हिंगणे वस्ती या ठिकाणीही काही महिलांनी बिबट्या पाहिला होता.
-------
आम्हाला परिसरात कुठलेही ठसे मिळाले नाहीत. नागरिकांच्या सांगण्यावरून माहिती घेतली जात आहे. आजही परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये.
- सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी
.................................
मांजरी : शेवाळवाडी परिसरातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ भवरावस्ती येथे बिबट्याचा वावर दिसून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

