निष्काळजी प्रशासनामुळे
नववीतील विद्यार्थी जखमी

निष्काळजी प्रशासनामुळे नववीतील विद्यार्थी जखमी

Published on

सिंहगड रस्ता, ता. १६ : येथील आनंदनगरमधील सनसिटी रस्ता परिसरातील चेंबरच्या तुटलेल्या जाळीत सायकल अडकून पडल्याने नववीतील विद्यार्थी समर्थ पाठक गंभीर जखमी झाला. या परिसरात महापालिकेच्या अपूर्ण आणि निष्काळजी कामाचा फटका पुन्हा एकदा एका निरपराध विद्यार्थ्याला बसला आहे.
सायंकाळी नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी निघालेला समर्थ हा आनंदनगरमधील एका वॉशिंग सेंटरसमोरून जात असताना रस्त्यावरील चेंबरच्या तुटलेल्या जाळीत त्याच्या सायकलचे चाक अडकले. क्षणातच समर्थ हवेत उडून थेट रस्त्यावर आदळला आणि त्याच्या दोन्ही हातांना, चेहरा आणि डोक्याला जोरदार मार बसला. या घटनेत सुदैवाने त्याचा डोळा वाचला.
धक्कादायक बाब म्हणजे, आनंदनगरमध्ये बहुतांश चेंबरवरील जाळ्या आडव्या न बसविता उभ्या बसविण्यात आल्या आहेत. यामुळे या जाळीत थोडीशी जरी फट निर्माण झाली, तरी सायकल किंवा दुचाकीचे चाक अडकून गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते. या परिसरातून दररोज शेकडो मुले सायकलने शाळा, क्लाससाठी ये-जा करत असतात. दुचाकीवरून कार्यालयात जाणाऱ्या नोकरदारवर्गाची संख्याही जास्त आहे. अशा परिस्थितीत अपघात म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.

ज्या चेंबरच्या जाळ्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहेत, त्याच्या दुरुस्तीची दखल कोण घेणार. जर माझ्या मुलाला कायमची इजा झाली असती, तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती?
- धनश्री पाठक, समर्थची आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com