आरोग्य सुविधा, स्वच्छता, वाहतुकीकडे दुर्लक्ष

आरोग्य सुविधा, स्वच्छता, वाहतुकीकडे दुर्लक्ष

Published on

प्रभाग १७ : रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी

हडपसर, ता. २० : रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी हा प्रभाग दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील भाग घेऊन नव्याने निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही भागांतील नागरिकांचे प्रश्न काहीसे वेगळे आहेत. वसाहती व काही उच्चभ्रू सोसायट्यांचा समावेश असलेल्या या भागात आरोग्य सुविधा, मैदाने, उद्याने, स्मशानभूमी, दफनभूमी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. पाटबंधारे खात्याच्या जागेवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. रस्ते व कालव्यात टाकला जाणारा कचरा आणि त्याभोवती अवैध बांधकामे झाली आहेत.

कै. अण्णासाहेब मगर प्रसूतिगृहाची नवीन इमारत वापराविना पडून आहे. किचकट व गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी शहरातील दवाखान्यात धाव घ्यावी लागते. भोसले गार्डन परिसरातील कै. रामचंद्र बनकर मैदानाची दुरवस्था झाली आहे. मगरपट्टा चौक ते मुळा-मुठा नदीपात्राकडे वाहणारा ओढा सांडपाण्याने वेढला आहे. त्याची दुर्गंधी नागरिकांना हैराण करीत आहे. अमर कॉटेज परिसरातील जलतरण तलाव, क्रीडांगण बंद व दुर्लक्षित आहे. माळवाडी परिसरात अनेक शाळा महाविद्यालये आहेत. सुमारे ३०-३५ हजार विद्यार्थी येथील विविध संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस येथे मोठी वाहतूक कोंडी होते. पथारी व हॉटेल व्यावसायिकांकडून रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.

कुबेरा विहार, प्रगती पार्क,पारिजात कॉलनी, साधना सोसायटी, इंद्रप्रस्थ सोसायटी या परिसरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. रामटेकडी झोपडपट्टी व रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील रस्ते दुरवस्थेत आहेत. हे सारे प्रकल्प रडत खडत चालू आहे. प्रभागातील लोहिया उद्यान, अण्णाभाऊ साठे उद्यान, स्मशानभूमी व दफनभूमी दुरवस्थेत आहेत. औद्योगिक वसाहतीत मधील रस्ता पालिकेच्या पाणी भरणा केंद्रावरील पाण्याच्या टँकरमुळे उखडला आहे.

चतु:सीमा :
पूर्व : इंद्रप्रस्थ सोसायटी, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, आनंदनगर
पश्चिम : एएसपीटी मैदान
उत्तर : पुणे-सोलापूर महामार्ग, मगरपट्टा , अमनोरा मॉल, माळवाडी
दक्षिण : सम्राट गार्डन सोसायटी, लोहिया उद्यान, मीरज रेल्वे लाइन, रामटेकडी औद्योगिक वसाहत, अंधशाळा, राज्य राखीव पोलिसदल वसाहत

समाविष्ट भाग :
रामटेकडी, वैदुवाडी, शंकरमठ, मगरपट्टा, भोसले गार्डन, अमर कॉटेज, आरूनगर, लोहियानगर, कामधेनू इस्टेट, माळवाडी, डीपी रस्ता, पीएमटी डेपो, भागीरथीनगर, प्रगती सोसायटी, पारिजात कॉलनी, साधना सोसायटी

प्रमुख समस्या :
- पाणीपुरवठा : माळवाडी येथील जनता वसाहत व शाहू सोसायटी, नोबेल हॉस्पिटलमागील मगरपट्टासिटी पश्चिम प्रवेशद्वार रस्ता, रामटेकडी आदी परिसरात रात्री-अपरात्री कुठे कमी दाबाने तर कुठे अपुरा पाणीपुरवठा.
- वाहतूक कोंडी : मगरपट्टा चौक, मगरपट्टा रस्ता, गोसावी वस्ती जवळील रेल्वे भुयारी मार्ग परिसरात वारंवार तर, साधना संकुल, सानेगुरुजी विद्यालय, एस. एम. जोशी महाविद्यालय परिसरात दररोज शाळा भरणे- सुटण्याच्या वेळेत मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी.
- नादुरुस्त सांडपाणी वाहिन्या : माळवाडी, रामटेकडी, वैदुवाडी परिसरातील अनेक सांडपाणी वाहिन्या जीर्ण व क्षमताहीन झाल्याने चेंबर तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहते.
- कचरा प्रश्न : रामटेकडी, वैदुवाडी, शंकरमठ परिसरासह गाडीतळ ते सिरम इन्स्टिट्यूटपर्यंतच्या बेबी कालवा परिसरात मोठ्याप्रमाणावर कचरा.
- रस्ते वाहतूक : माळवाडी, रामटेकडी, वैदुवाडी, शंकरमठ परिसरातील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. डीपी रस्त्यांची कामे
रखडलेली आहेत. रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील काही रस्त्यांचा विकास रखडला आहे.
- अपुरी आरोग्य सुविधा : महापालिकेच्या अण्णासाहेब मगर प्रसूतीगृहामध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने उपचारावर परिणाम.

कुठे? काय?
- मगरपट्टा पुलावर वारंवार वाहतूक कोंडी.
- कै. अण्णासाहेब मगर प्रसूतीगृहात अपुऱ्या सुविधा व डॉक्टर कर्मचाऱ्यांची संख्या कमी.
- प्रभागात ठिकठिकाणी पाण्याचे वॉल्व्ह वारंवार निखळून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती.
- शाळा इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था.
- म्हाडा प्रकल्पामध्ये उंदीर, घुशी व कचऱ्याचे साम्राज्य.
- साधना संकुल, साने गुरुजी विद्यालय व एस. एम. जोशी महाविद्यालय परिसरात शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी.
- प्रभागातील क्रीडा मैदाने देखभाल-दुरुस्तीअभावी ओस.
- मगरपट्टा-मुंढवा मुख्य रस्त्यावरती वाहतूककोंडी.
- प्रभागातून वाहणारा जुना कालवा कचऱ्याचे आगार.
- उड्डाणपुलाखालील परिसर तसेच रखडलेले उड्डाणपूल मद्यपींचा अड्डा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com