औंध-बोपोडी परिसरात विसर्जनाची जय्यत तयारी

औंध-बोपोडी परिसरात विसर्जनाची जय्यत तयारी
Published on

औंध, ता. १५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८ (औंध-बोपोडी) व ९ (सूस-बाणेर-पाषाण) मध्ये एकूण १३ विसर्जन घाट निश्चित करण्यात आले असून, या सर्व घाटांवर भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांनी सांगितले.

विसर्जनासाठी घाटांवर लोखंडी हौदांची व्यवस्था, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य कलश, तसेच सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी सेवक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहणार असून, भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घाटांवर तैनात राहणार आहेत.

नदीवरील विसर्जन घाटांची दुरुस्ती, लोखंडी हौदांची डागडुजी, रंगरंगोटी तसेच घाट परिसराच्या स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. काही घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे कामही करण्यात येत आहे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था करण्यात येणार असून, विसर्जन घाटांवर पुरेसा प्रकाश उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचीही तयारी करण्यात आली आहे. मंडप व्यवस्थेमध्येही आवश्यक सुविधा समाविष्ट करून भाविकांना विसर्जनाच्या वेळी सुरक्षित व सुलभ वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
--------------------
या ठिकाणी आहेत विसर्जन घाट
बोपोडी महादेव घाट, औंध
शांता आपटे घाट, बोपोडी
राजीव गांधी घाट, औंध
मलिंग घाट, औंध
बालेवाडी घाट
बाणेर घाट (स्मशानभूमीजवळ)
सोमेश्वरवाडी घाट
वाकेश्वर घाट, पाषाण
जयभवानीनगर घाट, सुतारवाडी रस्ता
आयटीआय मैदान, सुतारवाडी
जलतरण तलाव, सुतारवाडी
सूस स्मशानभूमी घाट
म्हाळुंगे घाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com