वाई:-प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत; आदर्श पहिली वर्गशिक्षकांचा वाईत सत्कार

वाई:-प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत; आदर्श पहिली वर्गशिक्षकांचा वाईत सत्कार
Published on

वाईत विद्यार्थी, वर्गशिक्षकांचा सत्कार

वाई शहर, ता. ८ : पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दुसरी, तिसरी, सहावीच्या प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता पहिली आदर्श वर्गाच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
पंचायत समिती सभापती विक्रांत डोंगरे, उपसभापती वर्षा जगताप, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, वृषाली चव्हाण, शैलेश सपकाळ, राणी पवार, हर्षदा फरांदे, स्वप्नील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुसरीच्या गुणवत्ता यादीत समर्थ साळुंखे, ऋग्वेद बाबर, मनस्वी इथापे, स्वानंदी भांडवलकर, देवांश इथापे, आरोही कदम, श्रीजा चव्हाण, पार्थ बाबर, विनीत बगाडे, कृष्णाली फरांदे, राजवीर निकम, अमेय घाडगे, आदित्य गायकवाड व वल्लभ जाधव यांनी यश मिळवले.
तिसरीच्या गुणवत्ता यादीत ज्ञानश्री भागवत, राजवीर पवार, फातिमा पठाण, अर्पित गाडे, यज्ञेश करपे, मनस्वी शिंदे, कादंबरी ओझर्डेकर, शिवांश चिकणे, रुद्र राऊत, शौर्या पवार व हिंदवी शेलार यांनी यश मिळवले.
इयत्ता सहावीच्या गुणवत्ता यादीत श्रेया जगताप, साईराज गायकवाड, ईश्वरी हेरकळ, आदिती गायकवाड, मोहित साळुंखे, श्रेयस भिंताडे, स्वरा पिसाळ, श्रीतेज साळुंखे, ओम भोसले व सुधांशू गायकवाड यांनी यश मिळवले.
इयत्ता पहिली आदर्श वर्ग स्पर्धेत २० पर्यंत पटसंख्येत मंगल फरांदे, संपदा घोडके व शीतल जांभळे, तसेच २० पेक्षा अधिक पटसंख्येत दीपक कासवेद, योगिता राजकर व सीमा डेरे या वर्ग शिक्षकांनाही गौरवण्यात आले.
सभापती विक्रांत डोंगरे, उपसभापती वर्षा जगताप, बापूसाहेब शिंदे, वृषाली चव्हाण, स्वप्नील गायकवाड, दिलीप बाबर, ईश्वरी हेरकळ यांनी मनोगत व्यक्त केले. गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव, साईनाथ वाळेकर, शकील मोमीन, निर्मला भांगरे, गजानन वारागडे, ज्ञानेश्वर वेंदे यांनी स्वागत केले. गट शिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे यांनी प्रास्ताविक केले. केशव कोदे, दीपक कासवेद यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com