

घोरपडी, ता. २८ : भारत फोर्ज कंपनीजवळ वेगवान रेल्वेच्या धडकेत ज्येष्ठ महिला ठार झाली. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कांता अशोक खरारे (वय ७०, रा. जाधव वस्ती, घोरपडी) असे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्या दुपारी कामावरून घाईघाईने रूळ ओलांडून घरी जात होत्या. त्या वेळी रेल्वेची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. स्वच्छतागृहांची साफसफाई करून दोन नातींचा त्या सांभाळ करीत होत्या. त्यांना आजी हाच एकमेव आधार होता. या घटनेमुळे दोन नातींचा एकमेव आधारही हरपला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करण्यासाठी दिरंगाई केली. सुमारे दोन तास मृतदेह रेल्वे रुळावरच पडून होता. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.