सहकाराबद्दल युवकांमध्ये विश्वास निर्माण करायला हवा ः सुशील जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकाराबद्दल युवकांमध्ये विश्वास 
निर्माण करायला हवा ः सुशील जाधव
सहकाराबद्दल युवकांमध्ये विश्वास निर्माण करायला हवा ः सुशील जाधव

सहकाराबद्दल युवकांमध्ये विश्वास निर्माण करायला हवा ः सुशील जाधव

sakal_logo
By

सहकार क्षेत्रात युवकांमध्ये विश्वास निर्माण करायला हवा. त्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात सहकार विषय चालू करायला हवा. को-ऑपरेटिव्ह बँकांनी डिजिटल व्हायची गरज आहे. सहकार क्षेत्र किती महत्त्वाचे आहे, हे युवा पिढीला पटवून देणे गरजेचे असून सहकार क्षेत्रातील यशस्वी संस्था युवकांच्या समोर आणल्या पाहिजेत, असे मत लोकमान्य मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीचे विभागीय प्रमुख सुशील जाधव जाधव यांनी व्यक्त केले.
‘सहकारी क्षेत्रात युवकांचा सहभाग’ या विषयावर ते बोलत होते. जाधव म्हणाले, ‘‘भारतातील युवाशक्तीला उद्योगाकडे वळविणे जास्त गरजेचे आहे. यात खासगी आणि सहकार क्षेत्र एकत्रित आल्यानंतर मोठी आर्थिक व्यवस्था निर्माण होऊ शकते. युवकांचा सहकारात सहभाग वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रांतून प्रयत्न व्हायला हवेत. सध्या सहकार आधुनिकीकरणामध्ये मागे जात आहे. त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’’
सहकारी बँकेतील सभासद नेहमी पन्नाशीच्या पुढचे असतात. युवकांमध्ये असा समज असतो को-ऑपरेटिव्ह म्हणजे को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे. को-ऑपरेटिव्ह क्षेत्रात युवाशक्ती आली नाही तर भविष्यात आत्तासारखे दिग्गज निर्माण होणार नाहीत. त्यापुढे जाऊन या संस्था चालणार कशा, असा प्रश्न निर्माण होतो. भारतातील अनेक युवक परदेशात जातात, तेव्हा तेथे को-ऑपरेटिव्ह बँकेत खाते काढतात, मग भारतातही असे होण्याची गरज असल्याचे जाधव म्हणाले.

फोटो- सुशिल जाधव