बाजारात १०० ट्रक फळभाज्यांची आवक

बाजारात १०० ट्रक फळभाज्यांची आवक

मार्केट यार्ड, ता. २६ : बाजारात फळभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे कांदा, बटाटा, सिमला मिरची, शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या भावात १० ते २० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. नवीन लसणाची आवक वाढली आहे. नवीन आणि जुन्या लसणाची मिळून प्रत्येकी पाच ट्रक आवक झाल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
येथील बाजारात रविवारी (ता. २६ ) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून ८ टेंपो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून चार टेंपो कोबी, राजस्थान येथून आठ ट्रक गाजर, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून चार टेंपो शेवगा, गुजरात येथून दोन टेंपो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून चार टेंपो घेवडा, आंध्र प्रदेश येथून तोतापुरी कैरी सहा टेंपो, मध्य प्रदेश येथून १३ ट्रक मटार, बंगळूर येथून एक टेंपो आले इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकीमध्ये सातारी आले सुमारे १२०० पोती, टोमॅटो १२ ते १३ हजार पेटी, गवार आणि भेंडी प्रत्येकी पाच ते सहा टेंपो, हिरवी मिरची चार ते पाच टेंपो, काकडी सात ते आठ टेंपो, फ्लॉवर १० ते १२ टेंपो, कोबी पाच ते सहा टेंपो, सिमला मिरची १० ते १२ टेंपो, तांबडा भोपळा ८ ते १० टेंपो, कांदा ७० ते ७५ ट्रक, आग्रा, इंदूर आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची ६० ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : ५०-१००, बटाटा : ६०-१२०, लसूण : नवीन - ३००-८५०, जुना - १५०-५५०, आले सातारी : २५०-५००, आले बंगलोर : ३००-४००, भेंडी : ३००-५००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १२०-१५०, दोडका : ३००-३५०,
हिरवी मिरची : ३५०-४५०, दुधी भोपळा : ६०-१००, चवळी : ३००-३५०, काकडी १५०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२५० , पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ४०-६०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १५०-३००, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २५०-३००, गाजर : १५०-२००, वालवर : २५०-३००, बीट : ६०-८०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : परराज्य: २२०-२६०, पावटा : ३००-३५० , तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१०० , नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांची आवक वाढली
पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे बहुतांश पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. कोथिंबिरीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे दोन रुपयांनी घट झाली आहे. तर, मेथी, कांदापात, करडई, पुदीना, अंबाडी, राजगिरा आणि चुकाच्या भावात प्रत्येकी एक रुपयांनी घट झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
येथील बाजारात रविवारी (ता. २६) कोथिंबिरीची एक लाख ५० हजार जुडींची आवक झाली. जी गेल्या आठवड्यात एक लाख २५ हजार रुपये होती. तर मेथीची ७० हजार जुडी आवक झाली. जी गेल्या आठवड्यात ५० हजार जुडी होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ३००-८००, मेथी : ३००-६००, शेपू : ४००-६००, कांदापात : ४००-७००, चाकवत : ३००-५००, करडई : ३००-५००, पुदीना :२००-५००, अंबाडी : ३००-६००, मुळे : ४००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ३००-६००, चवळई : ३००-५००, पालक : ३००-८००

फुलांच्या भावात घसरण
मार्केट यार्ड : फूलबाजारात सर्व फुलांची आवक साधारण आहे. मागणी अभावी सुट्ट्या फुलांसह शोभिवंत फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी :
७०-१२०, अ‍ॅष्टर : जुडी ४-६, सुट्टा ३०-५०, कापरी : २०-४०, शेवंती : ४०-६०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ४०-८०, जर्बेरा : २०-३०, कार्नेशियन : १००-१४०, शेवंती काडी १००-२००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ३००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ६०-१००, जिप्सोफिला : ३००-४००, मोगरा : ४००-६००.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com