लसूण, आले, टोमॅटो, मटारच्या भावात वाढ

लसूण, आले, टोमॅटो, मटारच्या भावात वाढ

मार्केट यार्ड, ता. १२ : फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे. मात्र मागणी वाढल्याने लसूण, आले, टोमॅटो, हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या भावात वाढ झाली असून सिमला मिरची आणि तोतापुरी कैरीच्या भावात घट झाली आहे तर अन्य सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
येथील बाजारात रविवारी (ता. १२) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आणि गुजरात येथून ८
ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ टेम्पो कोबी, राजस्थान येथून ४ ट्रक गाजर, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून ३ टेम्पो
घेवडा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ७ टेम्पो, मध्य प्रदेश येथून ६ ते ७ ट्रक मटार, मध्यप्रदेशातून लसूण ८ ते १० टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १३०० पोती, टोमॅटो १२ हजार पेटी, गवार ४ ते ५ टेम्पो, भेंडी प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा १५० ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची ३० ते ३२ ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : ८०-११०, बटाटा : ८०-१४०, लसूण : ३००-७००, आले सातारी : ३००-५००, भेंडी : ४००-५००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १४०-१६०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ४००-५५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : ३००-३५०, काकडी १५०-२००, कारली : हिरवी
३००-३२०, पांढरी : २००-२२०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : ६०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-३५०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १६०-१८०, शेवगा : ३००-३५०, गाजर : १६०-२२०, वालवर : २५०-३००, बीट : ६०-८०, घेवडा : ५००-५५०, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : स्थानिक ५००-६००, परराज्य: ३००-४००, पावटा : ३००-३५० , तांबडा भोपळा : १००-१६०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.


पालेभाज्यांच्या भावात घसरण
गुलटेकडी मार्केटयार्डात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यातुलनेत मागणी कमी असल्यामुळे कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात, करडई, मुळे, चुका, चवळई आणि पालकच्या भावात घट झाली आहे तर मेथी, शेपू, चाकवत, पुदीना, अंबाडी, राजगिऱ्याचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पुणे मार्केटयार्डातील बाजारात रविवारी (ता. १२ ) कोथिंबिरीची १ लाख ५० हजार जुडींची आवक झाली. तर मेथीची ७० हजार जुडी इतकी आवक झाली. घाऊक बाजारात कोथींबीर, कांदापात आणि पालकच्या भावात गड्डीमागे दोन रुपयांनी तर मेथी, करडई, मुळे, चुका आणि चवळईच्या भावात गड्डीमागे एक रुपयांनी घट झाली आहे.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ३००-८००, मेथी : २००-६००, शेपू : ३००-५००, कांदापात : ४००-८००, चाकवत : ३००-५००, करडई : ३००-६००, पुदीना :२००-४००, अंबाडी : ३००-५००, मुळे : ५००-८००, राजगिरा : ३००-५००, चुका : ३००-६००, चवळई : ३००-५००, पालक : ३००-८००़

कलिंगड, खरबूज आणि लिंबांच्या भावात वाढ
गुलटेकडी मार्केटयार्डात कलिंगड, खरबूज आणि लिंबाच्या भावात वाढ झाली असून पपईच्या भावात घट झाली आहे तर डाळिंब, चिक्कू, अननस, पेरू, संत्री आणि मोसंबीचे भाव स्थिर असल्याची
माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी (ता. १२) संत्री ४५ ते ५० टन, मोसंबी ३५ ते ४० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ५ ते ६ टेम्पो, लिंबांची सुमारे बाराशे ते सतराशे गोणी, कलिंगड २५ ते ३० गाड्या, खरबूज १५ ते २० गाड्या इतकी आवक झाली आहे.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रति गोणी) : ४००-१७००, मोसंबी : (३ डझन) : २८०-४००, ( ४ डझन) : १००-२२०, संत्री : (१०किलो) : ३००-८००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ६०-२५०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-८०. कलिंगड : ८-१४, खरबूज : १८-३०, पपई : १२-२०

फुलांच्या भावात घसरण
सर्व फुलांची आवक साधारण आहे. मात्र, मागणी नसल्याने फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : ५०-८०, ऑष्टर : जुडी १०-२०, सुट्टा ३०-६०, कापरी : १०-४०, शेवंती : ४०-६०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१५०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ८०-११०, शेवंती काडी : १००-२००, लिलियम (१० काड्या) ७००-१०००, ऑर्चिड ३००-५००, ग्लाडिओ (१० काड्या) : ४०-६०, जिप्सोफिला : १००-३००, मोगरा : ३००-४००.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com