भुईमूग शेंग, शेवगा, टोमॅटोच्या भावात घसरण मार्केटयार्ड ः कांदा, फ्लॉवर, घेवड्याच्या भावात वाढ, परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक

भुईमूग शेंग, शेवगा, टोमॅटोच्या भावात घसरण

मार्केटयार्ड ः कांदा, फ्लॉवर, घेवड्याच्या भावात वाढ, परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक
Published on: 

मार्केट यार्ड, ता. २८ : वाढत्या उन्हामुळे मार्केट यार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेने घटली होती. आवक घटल्याने कांदा, फ्लॉवर, घेवड्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. आवक वाढल्याने भुईमूग शेंग, शेवगा, टोमॅटोच्या भावात घट झाली होती. तर मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते. गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी (ता.२८) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकमधून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटक येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटक येथून घेवडा ३ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार ५ ते ६ ट्रक मटार, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे ८ ते १० टेम्पो इतकी आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० ते ९०० गोणी, भुईमूग शेंग २०० गोणी, काकडी ७ ते ८ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, गावरान कैरी १०० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक, इंदूर, आग्रा आणि गुजरात भागातून बटाटा २५ ते ३० ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : ६०-१२०, बटाटा : १२०-२००. लसूण : ४००-८००, आले : १२००-१४००, भेंडी : १५०- ३००, गवार : गावरान व सुरती २००-४००, टोमॅटो : ४०-८०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ३००-५००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : २००-२५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ६०-१००, वांगी : २००-३००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १८०-२००, शेवगा : २००-२५०, गाजर : १५०-२००, वालवर : २००-३००, बीट : १२०-१४०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १००-१५०, आवीर् : २००-२५०, घोसावळे : २००- २५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ३००-४००, मटार : परराज्य: ५००-६००, पावटा :५५०- ६००, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी - १२०-२००, कैरी गावरान : ५०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

चाकवत, पुदिनाच्या भावात घट
पालेभाज्या बाजारात रविवारी (ता. २८) पालेभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेने किंचितशी वाढली होती. मागणी कमी झाल्याने घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या शेकड्यामागे जुडींच्या भावात ५०० रुपये, शेपू ५०० रुपये, कांदापात १०० रुपये, चाकवत १०० रुपये, पुदिनाच्या भावात १०० रुपयांनी घट झाली होती. तर, आवक घटल्याने अंबाडीच्या शेकडा जुडीच्या भावात १०० रुपये, चुका २०० रुपये, चवळई १०० रुपयांनी वाढ झाली होती. इतर सर्वच पालेभाज्यांचे भाव स्थिर होते. मार्केटयार्डात रविवारी कोथिंबिरीची १ लाख ५० हजार जुडींची आवक झाली, तर मेथीची ५० हजार जुडी इतकी आवक झाली. ,पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-२२००, मेथी : १३००-१७००, शेपू : १२००-१८००, कांदापात : ६००-१२००, चाकवत : ३००-७००, करडई : ३००- ७००, पुदीना : २००-६००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ६००-१२००, राजगिरा : ४००-७००, चुका : ६००-१०००, चवळई : ३००-७००, पालक : ८००-१५००.

पपई आणि डाळिंबाच्या भावात वाढ
बाजारात रविवारी (ता. २८) फळबाजारात कलिंगड, खरबूज, पपई आणि डाळिंबाच्या भावात वाढ झाली असून लिंबाच्या भावात घट झाली आहे. तर चिक्कू, अननस, पेरू आणि मोसंबीचे भाव स्थिर
असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केटयार्डात केरळ येथून अननस ७ ट्रक, मोसंबी १० ते १५ टन, डाळिंब ३५ ते ४० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबांची सुमारे दोन ते अडीच हजार गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, पेरू ५० क्रेट्स, चिक्कू एक हजार डाग इतकी आवक झाली. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १००-६००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४००, (४ डझन) : १००-२५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-१६०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०, कलिंगड : ८-२०, खरबूज : १५-३५, पपई : ८-१५, अननस (एक डझन) : १००-५००, पेरू (वीस किलो) : ३००-४००, चिक्कू (दहा किलो) : १००-५००.

फुलांचे दर स्थिर
गुलटेकडी येथील फूलबाजारात फुलांची आवक आणि मागणी समप्रमाणात असल्याने सर्वच फुलांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १० ते ४० गुलछडी : ४० ते ६०, अष्टर : जुडी ३० ते ४०, सुट्टा ५० ते १५०, कापरी : ३० ते ५०, शेवंती : १०० ते १५० , (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ४० ते १००, जर्बेरा : १० ते ३०, कार्नेशियन : ८० ते १२०, शेवंती काडी १०० ते २००, लिलियम (१० काड्या) ८०० ते १०००, आॅर्चिड ३०० ते ४००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १०० ते १२० , जिप्सोफिला : १०० ते १५०, मोगरा : १५० ते २५०

PNE23T45498, PNE23T45500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com