शेतीमाल बाजारावर परिणाम

शेतीमाल बाजारावर परिणाम

Published on

मार्केट यार्ड, ता. १६ : राज्यभरात अजूनही म्हणावा तसा पाऊस न पडलेला नाही यंदा खरिपाच्या पेरण्या उशिरा होणार आहेत. भाजीपाल्यासह, डाळी आणि धान्य बाजारात काही प्रमाणात या वस्तूंचा तुटवडा जाणू लागला आहे. त्यामुळे ज्वारी, गहू, तांदूळ यासह भाजीपाल्याच्या भावात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात १ ते १४ जून या काळात पडलेला पाऊस सरासरीपेक्षा ५३ टक्क्यांनी कमी आहे. तर १६ जूनपर्यंत खरिपाची पेरणी ५० टक्क्यांनी मागे आहे. खरीप पेरणी उशिरा होणार आहे. त्याचे पडसाद आता शेतीमाल बाजारावर दिसून येत आहे. मागील एक महिन्यात गव्हाच्या भावात आठ टक्के वाढ झाली होती. त्यामुळे सरकारला स्टॉक लिमिट लावावे लागले. गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारला बफर स्टॉकमधला गहू विकावा लागेल. पण पाऊसमान कमी राहिल्यास रब्बीतील उत्पादनावरही प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे कमोडिटी मार्केटचे जाणकार अनिल जाधव यांनी सांगितले.
ज्वारी आणि बाजरीचे भाव मागील महिनाभरात किमान ७०० रुपयाने वाढले. तांदळाच्या भावातही पाच टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. तूर डाळीने अनेक बाजारांमध्ये १५० रुपये तर उडीद डाळीने १३० रुपयांचा टप्पा गाठला आहे. पावसाला आणखी उशीर झाल्यास डाळींचे भाव आणखी कडाडतील. आतापर्यंत दबावात असलेले मसूरचे भावही वाढीचा ट्रेंड दाखवत आहेत. हरभरा तेवढा सरकारकडे मुबलक प्रमाणात असून स्वस्त आहे.

अशी आहे स्थिती
- उशिराच्या पावसामुळे २५ टक्के भाजीपाला आवक घट
- पुढील दोन महिने तरकारी बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा राहील
- ज्वारी, गहू, तांदूळ यासह भाजीपाल्याच्या दरात वाढ
- उशिराच्या धान्याचे हंगाम उशिरा सुरू होणार
- पिके वेळेवर येत नसल्याने दरात तेजी


सध्या बाजारात गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, पोहे, मुरमुरे यांच्या दरात वाढ झालेली आहे. उत्पादन चांगले येऊन सुद्धा येणारा हंगामातील पिके वेळेवर येत नसल्याने आत्ताच तेजी सुरू होते.
- राजेश शहा, व्यापारी, मार्केट यार्ड.

विविध प्रकारच्या भाज्यांच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाने ताण दिला तर इथून पुढे दोन महिने तरी भाजीपाल्याचा तुटवडा राहण्याची शक्यता आहे.
- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com