लसूण, टोमॅटो, शिमला मिरची, घेवड्याच्या भावात वाढ

लसूण, टोमॅटो, शिमला मिरची, घेवड्याच्या भावात वाढ

मार्केट यार्ड, ता. २८ : गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे. परिणामी लसूण, टोमॅटो, शिमला मिरची आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली असून इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येथील बाजारात राज्यासह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची आठ टेम्पो, कर्नाटकातून कोबी चार टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडूतून चार टेम्पो शेवगा, राजस्थानमधून १२ टेम्पो गाजर, कर्नाटकातून घेवडा चार टेम्पो, मध्य प्रदेश व राजस्थान येथून १६ ट्रक मटार, कर्नाटकातून तीन टेम्पो पावटा, मध्य प्रदेश येथून लसणाची सहा टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून सातारी आले ७०० गोणी, भेंडी सहा टेम्पो, गवार तीन टेम्पो, टोमॅटो आठ हजार क्रेट, हिरवी मिरची सहा टेम्पो, काकडी आठ टेम्पो, फ्लॉवर १२ टेम्पो, कोबी सहा टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, पावटा पाच टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, शेवगा दोन टेम्पो, घेवडा सहा टेम्पो, कांदा १०० ट्रक, इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ५० टेम्पो आवक झाली, अशी माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे १० किलोचे भाव- कांदा : ८०-१३०, बटाटा : १२०-१७०, लसूण : २७००-३२००, आले सातारी : ७८०-८२०, भेंडी : ४००-६००, गवार : गावरान ६००-८००, टोमॅटो : २००-३००, दोडका : ४००-५००, हिरवी मिरची : ३००-५००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १६०-२००, कारली : हिरवी ३००-४००, पांढरी : २५०-३००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १२०-१६०, कोबी : १००-१४०, वांगी : १००-२००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ४५०-५५०, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : ५००-७००, गाजर : १६०-२२०, वालवर : २००-२५०, बीट : १४०-१५०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ७००-८००, मटार : ३५०-४००, पावटा : ३५०-४००,
तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

मेथी, शेपू, चाकवतच्या भावात घट
बहुतांश पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली. यामध्ये मेथी, शेपू, चाकवत, पुदीना, मुळे, चवळई, हरभरागड्डीच्या भावात घट झाली असून कोथींबीर, कांदापात, करडई, अंबाडी, राजगिरा, चुका आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
घाऊक बाजारात चाकवत आणि मुळ्याच्या भावात गड्डीमागे प्रत्येकी तीन रुपयांनी घट झाली तर हरभरागड्डी दोन रुपये, मेथी, शेपू, पुदीना आणि चवळईच्या भावात गड्डीमागे प्रत्येकी एक रुपयांनी घट झाली. कोथिंबिरीची पावणेदोन लाख, मेथीची एक लाख तर हरभरागड्डीची पाच हजार जुडी आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ५००-१२००, मेथी : ४००-७००, शेपू : ४००-७००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ३००-७००, करडई : ४००-७००, पुदीना : ३००-७००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ६००-१२००, राजगिरा : ४००-७००, चुका : ४००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ६००-१२००, हरभरा गड्डी : ५००-१०००.

डाळिंब, पपई, लिंबू महागले
फळबाजारात रविवारी डाळिंब, लिंबू आणि पपई महागले तर कलिंगड, खरबूज, सीताफळ, अननस, संत्रा, मोसंबी, चिक्कू आणि पेरूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
येथील बाजारात केरळ येथून अननस आठ ट्रक, मोसंबी ५० टन, संत्रा १२ टन, डाळिंब ३० टन, पपई २० टेम्पो, लिंबांची सुमारे दीड हजार गोणी, कलिंगड आठ टेम्पो, खरबूज सहा टेम्पो, सीताफळ १२ टन तर चिक्कूची दोन हजार बॉक्स आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ५००-७००, अननस (१ डझन) : १००- ६००, मोसंबी : (३ डझन) : २६०- ४५०, (४ डझन) : १००-२५०, संत्रा : (१० किलो) : २५०-७५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२००, गणेश : १०-३०, आरक्ता : २०-६०, कलिंगड : १०-१५, खरबूज : १५-३०, पपई : १५-२०, चिक्कू (१० किलो) : १००-५००, सीताफळ (एक किलो) : १०-६०.

फुलांचे भाव स्थिर
येथील फूलबाजारात फुलांची आवक साधारणच होती; मात्र मागणीही साधारण असल्याने भाव स्थिरच असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : ७०-१००, गुलछडी : २५०-३००, अ‍ॅष्टर : जुडी : १४-२०, सुट्टा : ८०-१२०, कापरी : ७०-१००, शेवंती : ७०-११०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२५, गुलछडी काडी : १३०-१५०, डच गुलाब (२० नग) : १८०-२५०, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी : २००-३००, लिलीयम (१० काड्या) : ८००-१०००, आॅर्चिड : ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : २००-४००.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com