टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवग्याला मागणी वाढली

टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवग्याला मागणी वाढली

मार्केट यार्ड, ता. ४ : गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत जास्त झाली. परिणामी बहुतांशी फळभाज्यांच्या भावात ५-१० टक्क्यांनी घट झाली. मागणी जास्त असल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची आणि शेवग्याच्या भावात वाढ झाली असल्याची असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डात रविवारी (ता. ४) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १० ट्रक इतकी फळभाज्यांची आवक झाली.
परराज्यांतून झालेल्या आवकेत कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे ८ ते १० टेम्पो, कर्नाटक, कर्नाटकातून येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ११ ते १२ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, मध्य प्रदेश व राजस्थान येथून १५ ते १६ ट्रक मटार, कर्नाटक येथून २ ते ३ टेम्पो पावटा, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे ६ टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेत सातारी आले सुमारे ६०० ते ७०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो सुमारे ८ ते ९ हजार क्रेट, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, घेवडा ५ ते ६ टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ५० टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती
ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : १४०-१७०, बटाटा : १२०-१७०, लसूण : १५००-३०००, सातारी आले : ७५०-८५०, भेंडी : ३५०-४००, गवार : गावरान ७००-८००, टोमॅटो : २८००-३२०, दोडका : ४२०-४५०, हिरवी मिरची : ३००-३२०, दुधी भोपळा : ७०-८०, चवळी : ३२०-३५०, काकडी : १२०-१४०, कारली : हिरवी २६०-२८०, पांढरी :
३२०-३५०, पापडी : १२०-१५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी :१००-१३०, वांगी : ८०-१००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ३००-३२०, ढोबळी
मिरची : ४००-५००, तोंडली : कळी : २५०-३००, जाड : १५०-२००, शेवगा : ६५०-७००, गाजर : ८०-१२०, वालवर : १२०-१६०, बीट : १२०-१४०, घेवडा :
२५०-३००, कोहळा : १५०-२००, आर्वी: २००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : ४००-४५०, भुईमुग शेंग : ५००-६००, मटार : ३५०-४००, पावटा : ३५०-४००,
तांबडा भोपळा : १६०-२२०, सुरण :३००-३५०, मका कणीस : ८०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

मेथी, शेपू, पुदीना, हरभरा गड्डीच्या भावात घट
मार्केट यार्डात रविवारी बहुतांश पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली. यात कोथिंबीर, पुदिना, अंबाडी, राजगिरा, चुका, हरभरा गड्डीच्या भावात २ ते ३ रुपयांनी गड्डीमागे घट झाली आहे. शेपूच्या भावात ३-४ रुपयांनी वाढ झाली. तसेच इतर सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी (ता. ४) कोथिंबिरीची दोन लाख जुडी, तर मेथीची एक लाख जुडी आणि हरभरागड्डीची ४ ते ५ हजार जुडी इतकी आवक झाली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
कोथिंबीर : ५००-६००, मेथी : ४००-५००, शेपू : ८००-१००००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००- ६००, पुदीना : २००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-६००, पालक : ५००-६००, हरभरा गड्डी : ६००-८००.

डाळिंब, सीताफळ, लिंबू, कलिंगडात वाढ
फळबाजारात रविवारी (ता. ४) डाळिंब, लिंबू, सीताफळ, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात वाढ झाली असून, अननस, बोरे, संत्रा, मोसंबी, पेरू आणि चिकूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. केरळ येथून अननस ७ ट्रक, मोसंबी ५५ ते ६० टन, संत्रा ३० ते ३५ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबांची सुमारे एक हजार ते १३०० गोणी, बोरे ४०० ते ४५० गोणी, कलिंगड ८ ते १० टेम्पो, खरबूज ८ ते १० टेम्पो, सीताफळ ४ ते ५ टन, चिक्कू दोन हजार बॉक्स इतकी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फळांचे भाव
लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१३००, अननस (१ डझन): १००-६००, मोसंबी : (३ डझन): १००- ४५०, (४ डझन) : ३०-२५०, संत्रा : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-२२०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-६०, कलिंगड : १२-२०, खरबूज : १५- २५, पपई : १०-२२, चिक्कू (दहा किलो) : १००-५००. सीताफळ (एक किलो): २०-१००.

झेंडूला भाव कमी
फुलबाजारात फुलांची आवक साधारण होती. त्यातच मागणीही जेमतेम असल्याने फुलांचे भाव स्थिर होते. मात्र झेंडूची आवक जास्त असल्याने भावात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे भाव
झेंडू : ३०-५०, गुलछडी : १५०-१७०, अ‍ॅष्टर : जुडी १०-१४, सुट्टा ५०-८०, कापरी : ३०-६०, शेवंती : ५०-८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ८०-२५०, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : ६०-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१००, जिप्सोफिला : २००-२५०.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com