भारतीय बासमती शिजतोय १५० देशांत

भारतीय बासमती शिजतोय १५० देशांत

मार्केट यार्ड, ता. २९ : भारतातून बासमती तांदळाची निर्यात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षात करण्याचा सर्वाधिक विक्रम स्थापित करण्यात आला आहे. जगातील सुमारे १५० देशांत भारताने प्रथमच ५० लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे.

मागील तीन वर्षांच्या कालावधीमध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीत ११.५ टक्के वाढ होऊन ती ४९ लाख टनांपर्यंत झाली होती. २०२३ मध्ये त्या निर्यातीपासून देशाला ५.३ अब्ज डॉलर म्हणजेच ४४,००० कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा आजवरची सर्वाधिक विक्रमी निर्यातीतून ५.७ अब्ज डॉलर परकीय चलन भारताला प्राप्त झाले आहे. रुपयांमध्ये साधारणतः ४८,००० कोटी रुपये उत्पन्न फक्त बासमती तांदळाच्या निर्यातीतून देशाला मिळाले आहे. हे आजपर्यंतचे सर्वाधिक निर्यातमूल्य असल्याचे मार्केट यार्डातील तांदळाचे निर्यातदार व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.

यावर्षी बासमती तांदळाची निर्यात वाढण्याचे कारण म्हणजे मागील वर्षी (जून २०२३) पासून आपल्या देशातून नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीला बंदी घातली आहे. त्यामुळे जगभरातील भारतीय लोक इंडियन बासमती तांदळाकडे वळलेले आहेत. त्यामुळे बासमती तांदळाचा खप विविध देशांत वाढला आहे. त्याचबरोबर निर्यात वाढीचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानातून बासमती तांदळाची निर्यात होत होती. परंतु मागील वर्षी पाकिस्तानात निवडणुका आणि काही राजकीय परिस्थितीमुळे तेथील बासमतीची निर्यात कमी झाली. पर्यायाने भारतीय बासमतीची निर्यात वाढली.

या राज्यात उत्पन्न आणि या देशात निर्यात
भारतात बासमतीचे उत्पादन प्रामुख्याने पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांत वेगवेगळ्या प्रकारचे बासमती तांदळाचे उत्पादन निर्माण होते. गंगा नदीचे पाणी व त्या-त्या ठिकाणांच्या विशिष्ट प्रकारच्या शेत जमिनीतील गुणधर्मामुळे बासमती तांदळाचे उत्पादन त्या भागातच निघते. देशातून यु. एस. ए., युरोपिअन देश, ब्रिटन, सौदी अरेबिया, आशिया, इराण, यु. ए. इ. इराक, अशा जगातील १५० देशांत बासमती तांदळाची निर्यात होते.

इराण आणि इस्राईल संघर्षामुळे दर वाढीची शक्यता
सध्या सुरू असलेले इराण आणि इस्राईल यांच्या संघर्षामुळे बासमती तांदळाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. भारतातून साधारण १५० देशांत बासमती तांदळाची निर्यात होते. निर्यातीसाठी बासमतीच्या प्रति टनाचा दर ८००० ते १२, ००० रुपयांपर्यंत असतात.

निर्यात होणाऱ्या
बासमती तांदळांचे प्रकार
-पारंपारिक बासमती
-११२१ बासमती
-१५०९ बासमती
-१४०१ बासमती
-पुसा बासमती

भारतातून प्रथमच ५० लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. मागील वर्षी आपल्या देशात बासमती तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघाले होते. त्यामुळे वर्षभर दरांमध्ये खूप मोठा बदल झाला नाही. भाव स्थिर असल्यामुळे बासमती तांदळाची निर्यात वाढली.
- राजेश शहा, निर्यातदार व्यापारी, मार्केट यार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com